आदिवासीबहुल नक्षल भागातील ककोडी जि. प. शाळेचा १००% टक्के निकाल

0
21

ककोडी,दि.18ः- म. रा . माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे अंतर्गत विभागिय बोर्ड नागपुरच्या वतीने मार्च २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या १० वी च्या परीक्षेत ककोडी जि.प.हायस्कुल शाळेचा १००% टक्के निकाल लागला.
आदिवासी भागातील अतीसंवेदनशील नक्षल क्षेत्रातुन तालुक्यातील एकमात्र जि.प.हायस्कुल ककोडीच्या शाळेचा १००% टक्के निकाल लागला.परिक्षेला एकुण ५५ विद्यार्थी बसले होते. परिक्षेत विशेष प्राविण्यासह ०७ विद्यार्थी, प्रथम श्रेणीत २३ विद्यार्थी, िव्द्तीय श्रेणीत २० विद्यार्थी तर ०५ विद्यार्थी तृतीय श्रेणीत उतीर्ण झाले.
विद्यार्थांचा यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्यधापक ए.व्ही.मेश्राम,श्री.बिरणवार,अक्षय उकणकर,श्री.ऊके,कु.प्रिती अचुत्रा,श्री. पटले,श्री.लाडे,श्री.चौहाण व श्री.कोटागंले यांच्यासह देवरीचे गटशिक्षणाधिकारी महेंद्र मोटघरे यांचे विशेष मार्गदर्शन राहिले.सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले.