आमगाव,दि.18ः- राज्य परिक्षा मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या तालुक्यातील हरिहरभाई पटेल हायस्कूल चिरचाळबांधचा इयत्ता 10 वी परिक्षेचा निकाल 91.17 टक्के लागला असून 93 विद्यार्थी प्राविण्यश्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.तर 27 विद्यार्थी प्रथम श्रेणी,42 विद्यार्थी द्वितिय श्रेणीत उत्तीर्ण झाले.शाळा स्तरावर अनमोल योगराज टेंभरे(93.80%) गुण मिळवून प्रथम आला.तर रोहित राजकुमार चौधरी (91.20%) व्दितीय,मुस्कान योगराज टेंभरे(90.20%)तृतीय आली.त्याप्रमाणे नंदिनी अजय चौधरी(89.40%),सुजल हटवार (89.20%),रोशनी मेश्राम (89.00%),करिष्मा लांजेवार(88.80%),गुणेश्वर येरपुडे (87.80%)या विद्यार्थ्यानीही श्रेणीत स्थान मिळविले.या
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन जगत कल्याण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष जगतराम रहांगडाले,सचिव नारायणराव येळे,उपाध्यक्ष सौ.सी.एन.येळे, सहसचिव सौ.विमलताई रहांगडाले,कोषाध्यक्ष डाॅ.सचिन रहांगडाले,प्राचार्य ओ.टी.चौधरी,ज्यु.कॉ.प्रभारी आर.एच. बांदरे, हाय.प्र.बी.व्ही.शहारे,उच्च माध्यमिक व माध्यमिक,मिडल शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी केले.