गोरेगाव,दि.१८ः- महाराष्ट्र राज्य परिक्षा मंडळाच्यावतीने मार्च 22 मध्ये घेण्यात आलेल्या 10 वी परिक्षेचा निकाल जाहिर झाला असून तालुक्यातील परशुराम विद्यालय मोहगाव बु. चा निकाल 94.22 टक्के लागला आहे.एकूण विद्यार्थी ६० पैकी परिक्षेला ५८ बसले व ५५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.यात प्राविण्य श्रेणीत १३,प्रथम श्रेणी २६,व्दितीय श्रेणीत १५ व तृतीय श्रेणी ०१ विद्यार्थी उत्तीर्ण झाला असून विद्यालयातून शाहील टेंभरे या विद्यार्थ्याने ८४.८० टक्के गुण प्राप्त करीत प्रथम क्रमांक पटकावला.तर तृप्ती पारधी ८३.२० टक्के व्दितीय,समीर टेंभरे ८३ टक्के व प्रगती रामटेकेने ८३.००टक्के गुण प्राप्त करीत सयुंक्त तृतीय क्रमांक पटकावला. प्राविण्य प्राप्त व दिव्यांग विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन पुष्पगुच्छ देऊन विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे अभिनंदन करण्यात आले.याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक बी.डब्लु.कटरे,स.शि.व्ही.एस.मेश्राम,टी.एफ.ईडपाचे,श्रीमती.भारती कटरे,कु.ममता गणविर,के.बी.पारधी हे उपस्थित होते.