आमगाव येथे तीन गोठे जळाल्याने लाखोंचे नुकसान

0
35

आमगाव-तालुक्यातील नंगपुरा येथे वीज कोसळल्याने शेतकरी दशरथ टेंभरे परिवारातील तीन भावंडांचे गोठे रात्रीच्या सुमारास आगीत भस्मसात झाले. या तीन गोठ्यात १९५ पोते धान, शेतीची अवजारे आणि ६ बकर्‍या या आगीत भस्मसात झाले असून जवळपास ५ लाखांचे नुकसान झाले. वेळीच सावध झाल्याने लोकांचा जीव वाचविण्यात यश आले. मात्र त्याठिकाणी ठेवलेले सर्व साहित्य आणि कागदपत्र जळून नष्ट झाले. वेळीच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. मात्र तोपयर्ंत धान्य आणि जनावरे जळून गेल्याने मोठे नुकसान झाले. दशरथ टेंभरे व हेमंत टेंभरे या कुटुंबीयांना शासनाने नुकसानभरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे.