31.2 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home Featured News ग्रंथदिंडीने विदर्भ साहित्य संमेलनाला प्रारंभ

ग्रंथदिंडीने विदर्भ साहित्य संमेलनाला प्रारंभ

0
31

blank

चंद्रपूर : मनोवेध सांस्कृतिक प्रतिष्ठान चंद्रपूरतर्फे स्थानिक पोलीस फूटबॉल ग्राऊंडवर आयोजित विदर्भ साहित्य संघाच्या ६५ व्या विदर्भ साहित्य संमेलनाला शुक्रवारी ग्रंथदिंडीने प्रारंभ झाला.
दुपारी २ वाजता आझाद बगीचा येथून ग्रंथदिंडीला सुरूवात झाली. संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद देशमुख यांनी ग्रंथदिंडीचे पूजन केले. यावेळी सिनेनिर्माता तथा दिग्दर्शक, लेखक शंतनू रोडे, कार्याध्यक्ष वामन तेलंग, संमेलन निमंत्रक प्रकाश एदलाबादकर, स्वागताध्यक्ष प्रा. विजय बदखल, कार्याध्यक्ष किशोर जोरगेवार, आदी उपस्थित होते.
गं्रथदिंडीत चंद्रपूर शहरातील विविध शाळा, महाविद्यालयाचे विद्यार्थी व शिक्षक सहभागी झाले होते. यात विद्यार्थिनींचा लेझीम पथक आकर्षण ठरला. वंदे मातरम्, भारत माता की जय, अशा विविध घोषणा देत ग्रंथदिंडीत सहभागी विद्यार्थी समोर जात होते. विद्यार्थिनींनी महाराष्ट्रीय पोशाख परिधान करून विविध वेशभूषा साकारल्या होत्या. त्यामुळे महाराष्ट्रीयन संस्कृतिचे दर्शन ग्रंथदिंडीच्या माध्यामातून घडले. जटपुरा गेटवर ग्रंथदिंडीवर पुष्पांचा वर्षाव करण्यात आला. ही ग्रंथदिंडी जटपुरा गेट वरून रामनगर चौक मार्गे पोलीस फुटबॉल मैदान स्व. शरद जोशी साहित्यनगरी येथे पोहोचली. येथे ग्रंथदिंडीचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर सायंकाळी संमेलनाचे उद््घाटन झाले. यावेळी साहित्य क्षेत्रातील मान्यवर व नागरिकांची उपस्थिती होती.

blank