युवकांचे भविष्य बरबाद करणारी अग्निपथ योजना तात्काळ मागे घ्या

0
23

* राष्ट्रवादी युवक काँग्रेसची पंतप्रधानांना विनंती
साकोली –केंद्रशासनाने सैन्यभरतीसाठी जाहीर केलेली अग्निपथ ही महत्वाकांक्षी योजना युवकांचे भविष्य बरबाद करणारी असल्याने ती तत्काळ रद्द करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन साकोली तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष निखील जीपकाटे यांच्या नेतृत्वात साकोली तहसिलदार यांच्यामार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन देण्यात आले.

केंद्र सरकारने सैन्य भरती करीता जी योजना आणली आहे ती तात्काळ रद्द करावी ही अग्निपथ योजना युवकांसाठी त्यांचे भविष्य बरबाद करण्यास  कारणीभूत ठरेल. १७-१८ वर्षाच्या युवकांना सैन्यात घ्यायचे आणि सैनिकी प्रशिक्षण देवून वयाच्या २२ व्या  वर्षी हातात दहा वीस लाख रुपये देऊन घरी बसवायचे. शिकायच्या वयात नोकरी द्यायची ती सुद्धा फक्त चारच वर्षासाठी परंतु २२ व्या वर्षी निवृत्त झाल्यानंतर या युवकांच्या भविष्याचं काय ?
निवृत्त झाल्यानंतर दहावी-बारावीचे प्रमाणपत्र आणि सेवानिवृत्तीचे काही पैसे सोडले तर या युवकांच्या हातात काहीच राहणार नाही. अर्धवट शिक्षणामुळे भविष्यात नोकरी मिळेल याची शाश्वती नसेल. शिक्षण आणि भविष्यात नोकरी नसल्यामुळे यातील अनेक मुले दिशाहीन होऊन भरकटू शकतात. म्हणून भंडारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आम्ही जिल्हाधिकारी भंडारा मार्फत आपल्याला मागणी करत आहोत की आपण तात्काळ ही योजना रह करावी अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.

ही योजना रद्द न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे संपूर्ण जिल्हाभर तीव्र आंदोलन करण्यात येईल व त्याची जवाबदारी केंद्र सरकारची राहील याची शासनाने नोंद घ्यावी असा इशारा देखील या निवेदनात देण्यात आला आहे.निवेदन सादर करतांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष निखील जिभकाटे, आशिष गुप्ता, स्वामी नेवारे.गौरव कापगते,तेजस राऊत, सचिन सुखदेवे, विकास कटकवार, विशाल वाघाडे, शिवा गुरनुले, अजय मोहुर्ले, गौरव उजवणे, नितिन चाचेरे, मोहनिश कोटांगले, किशारे बावणे, प्रविण कांबळे, मयूर राऊत, महेश नेताम,  रोशन बागडे, रजत काळसर्पे, गौरव भैसारे, रिजवान सय्यद, राजू हटवार आदी युवा कार्यकर्ते उपस्थित होते.