ही आहे आमदारांची भावना… pic.twitter.com/U6FxBzp1QG
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 23, 2022
मुंबई – शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा निवासस्थान सोडून मातोश्रीत राहायचा निर्णय घेतला आहे.शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरेंनी भावनिक आवाहन करत मी राजीनामा द्यायला आणि पक्षप्रमुखपदही सोडायला तयार असल्याचे सांगितले. त्यानंतर, राज्याच्या राजकारणात सातत्याने घडामोडी घडत आहेत. दुसरीकडे एकनाथ शिंदेंच्या गटाला जाऊन मिळणाऱ्या आमदारांची संख्या वाढत आहे. त्यातच आता एकनाथ शिंदेंनी आणखी एक ट्विट करुन आमदांराची भावना व्यक्त केली आहे.
एकनाथ शिंदेनी ट्विटरच्या माध्यमातून एक पत्र जाहीर केलं आहे. त्यामध्ये, एकनाथ शिंदेंनी शिंदे गटातील आमदारांच्या भावना स्पष्टपणे मुख्यमंत्र्यांना आणि शिवसेना पक्षप्रमुखांना सांगण्याचा प्रयत्न केला आहे. औरंगाबादचे आमदार संजय शिरसाट यांनी तीन पानी पत्र लिहून आपली भावना व्यक्त केली आहे. त्यामध्ये, बडव्यांपासून होणारा त्रास, मातोश्री किंवा वर्षा बंगल्यावर ताटकळत बसावं लागणं आणि हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरुन अयोध्या दौऱ्यावेळी झालेली अवहेलना शिरसाट यांनी पत्रातून मांडली आहे