राजर्षी शाहू महाराज जयंती व आंतरराष्ट्रीय मादक पदार्थ विरोधी दिवस कार्यक्रम संपन्न
गोंदिया,दि.27ः श्री गणेश ग्रामीण विकास शिक्षण संस्था द्वारा संचालित बाहेकरजी व्यसन मुक्ती केंद्र गोंदिया व समाज कल्याण विभाग गोंदिया तर्फे आंतरराष्ट्रीय मादक पदार्थ विरोधी दिवस तसेच राजर्षी शाहू महाराज यांची जयंती आणि सामाजिक न्याय दिवस कार्यक्रम बाहेकरजी व्यसन मुक्ती केंद्रात साजरा करण्यात आला. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे संस्थापक दलीत मित्र पुरस्कृत विजय बाहेकर हे होते. तर प्रमुख अतिथि म्हणुन विशेष दंडाधिकारी किशन उके, कविता उके उपस्थित होते.विजय बाहेकर यांनी मार्गदर्शन करताना म्हटले की जरी तुम्ही व्यसनाचा उपचार घेत आहात तरी सुद्धा तुमच्या अंगात असलेले सुप्तगुणांना विकसित करण्यासाठी केंद्रातील समुपदेशकानी त्यावर भर द्यावे. आणि लाभार्थ्यानी आपल्या अंगात असलेले कला गुण , कौशल्य दाखवावे. त्यामुळे तुमची प्रगती होइल त्यासाठी तुम्हाला व्यसनमुक्त जीवन जगावे लागेल व व्यसनमुक्तिचे संदेश लोकाना देण्यासाठी तुम्हाला संदेश वाहक बनावे लागेल, यातच तुमचा सामाजिक न्याय दिसून येइल.उके यांनी व्यसन एक विनाशकारी वादळ आहे. या वादळात आज आपल्या देशातील युवा पिढी अडकलेली आहे. या विनाशकारी वादळाला आत्ताच जर थांबवले नाही, तर कितीतरी नवयुवक उगवता सूर्य बघण्यासाठी शिल्लकच राहणार नाहीत. मेंदूला बधीर करणा-या कोणत्याही मादक पदार्थाचे अतिरेकी सेवन करणारी व्यक्ती म्हणजेच व्यसनी व्यक्ती. ही व्यक्ती स्वत:च्या पायाने एक एक पायरी उतरत मृत्यूच्या गर्तेत एके दिवशी संपून जाणार आहे हे बोलले.कार्यक्रमात शालू कृपाले समाजसेविका यांनी व्यसनमुक्ति यावर कविता सादर केली. कार्यक्रमाच्या यसस्वितेसाठी मनीष मुनेश्वर प्रकल्प समन्वयक , ज्योति कोटागले समाजसेविका ,सुनीता सवालाखे नर्स ,मदन राउत वार्ड बॉय ,लाभार्थी यानी सहकार्य केले.