
भंडारा- रेती वाहतुकदाराच्या ट्रकवर कायदेशीर कारवाई न करण्यासाठी लाच मागणार्या भंडारा तहसील कार्यालयातील मंडळ अधिकारी आणि वाहनचालकावर भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करुन ताब्यात घेतले. ही कारवाई मंगळवारी करण्यात आली.
वाहनचालक अविनाश भानुदास राठोड (४४) आणि मंडळ अधिकारी रामू बकाराम नेवारे (५६) अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. यातील तक्र ारदार हा मोहाडी तालुक्यातील रोहा येथील रहिवासी असून तो हार्डवेअर दुकानदार म्हणून काम करतो. त्याच्या मालकीचे दोन ट्रक असून ते वाळूची वाहतूक करण्यासाठी वापरतो. ७ जून रोजी तहसीलदार भंडारा आणि महसूल कर्मचारी यांनी तक्रारदार याचा एक अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रक पकडून कार्यवाही करून पोलिस स्टेशन वरठी येथे स्थानबद्ध केला होता. वाळू वाहतूक करणार्या ट्रकवर तहसीलदार यांच्यामार्फत कायदेशीर कारवाई करण्याची धमकी देऊन कार्यवाही न करण्याच्या मोबदल्यात मंडळ अधिकारी नेवारे यांनी १५ हजार रुपये व वाहनचालक राठोड याने ५ हजार रुपयांची मागणी तक्र ारदाराकडे केली होती. याची तक्र ार भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केल्यानंतर पडताळणी करण्यात आली. पडताळणी दरम्यान संभाषण रेकॉर्ड होत असल्याचे मंडळ अधिकार्यांच्या लक्षात आल्याने लाच रक्कम स्वीकारण्याची शक्यता नसल्याने कलम 0७ भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ प्रमाणे कारवाई करण्यात आली. मंडळ अधिकारी आणि वाहनचालकांना ताब्यात घेण्यात आले. ही कार्यवाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक महेश चाटे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक कमलेश सोनटक्के, अमित डहारे, संजय कुरंजकर, मिथुन चांदेवार, विष्णू वरठी, अंकुश गाढवे, कुणाल कडव, राजकुमार लेंडे, विवेक रणदिवे, अभिलाषा, दिनेश धार्मिक यांनी केली.