महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले एकनाथ शिंदे तर फडणवीसांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ

0
113

मुबंई,दि.30ः महाराष्ट्राचे 25 वे मुख्यमंत्री म्हणून गुरुवारी बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली.उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. या सोहळ्यानंतर गेल्या दहा दिवसांपासून रंगलेल्या सत्तासंघर्षाला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. शपथविधी सोहळ्याला शिंदे समर्थकांनी यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाची जोरदार घोषणाबाजी केली.


अंतर्गत वादाचा तडका

देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होणार अशी चर्चा होती. मात्र, राजभवनात झालेल्या पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा केली. त्यामुळे अनेकांना धक्का बसला. विशेष म्हणजे आपण मंत्रिमंडळात सहभागी होणार नसल्याचेही फडणवीस म्हणाले. मात्र, शपथविधी सोहळ्यापूर्वी भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी फडणवीसांनी मंत्रिमंडळात सहभागी व्हावे, अशी इच्छा व्यक्त केली. त्यानंतर गृहमंत्री अमित शहा यांनी एक ट्विट केले. त्यात देवेंद्र फडणवीस हे जे. पी. नड्डा यांचे म्हणणे मोठ्या मनाने मान्य करत उपमुख्यमंत्री म्हणून मंत्रिमंडळात सहभागी होणार असल्याचे सांगितले. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोनदा फोन केल्यानंतर फडणवीस उपमुख्यमंत्री व्हायला तयार झाल्याच्या बातम्याही आल्या.


शिंदेची पहिली प्रतिक्रिया

मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, हा बाळासाहेबांच्या आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचारांचा विजय आहे. राज्याचा विकास, महाराष्ट्राच्या सर्व घटकाला न्याय देण्याचे काम करू. सर्वांना सोबत घेऊन, विश्वासात घेऊन काम करेन. आता देवेंद्र फडणवीस सुद्धा सोबत आहेत. या साऱ्यांच्या साथीने विकासाचा गाढा हाकेन.

शपथविधीसाठी एकनाथ शिंदे आपल्या कुटुंबासह उपस्थित. आनंदी प्रसंगी शिंदेंनी आपल्या नातवाला घेतले कडेवर. एकनाथ शिंदे यांनी आपल्या नातवाला कडेवर उचलून घेतले.
फडणवीसांनी उपमुख्यमंत्री व्हावे, अशी भाजपच्या केंद्रीय टीमची इच्छा असल्याची माहिती पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डांनी माध्यमांना दिली. त्यानंतर केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी ट्वीटरवरून देवेंद्र फडणवीस सत्तेत सहभागी होणार असल्याची माहिती दिली. आपल्या ट्वीटमध्ये शहा म्हणाले की, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या सांगण्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी मनाचा मोठेपणा दाखवत महाराष्ट्र राज्य आणि जनतेच्या हितासाठी सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचा हा निर्णय त्यांच्या महाराष्ट्राप्रति असलेल्या खऱ्या निष्ठेचे आणि सेवेचे द्योतक आहे. त्याबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो..
सेना टाकणार का बहिष्कार:शिवसेनेशी बंडखोरी करणाऱ्या एकनाथ शिंदेंच्या शपथविधीला उद्धव ठाकरे हजेरी लावणार का?…
पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, २०१९ च्या निवडणुकीत शिवसेनेने ५६ जागा जिंकल्या. भाजपला १०५ जागा मिळाल्या. पंतप्रधानांनी भाजपचा मुख्यमंत्री होईल, अशी घोषणा केली होती. मात्र, तेव्हा निकाल आल्यानंतर तेव्हाचे आमचे मित्र आणि नेते यांनी शब्द फिरवला. विशेष म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांनी ज्यांचा अजन्म विरोध केला, अशा काँग्रेस राष्ट्रवादीसोबत युती केली. भारतीय जनता पक्षाला बाहेर ठेवले. हा जनमताचा अपमान होता.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जनतेने महाविकास आघाडीला मत दिले नव्हते. भाजप-शिवसेना युतीला दिले होते. एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे गटनेते आहेत. आमच्याच मतदार संघात हरलेल्या विरोधकांना निधी दिला जात असेल, तर कशाच्या जोरावर लढायचा हा प्रश्न शिवसेना आमदारांसमोर होता. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी सोबतची युती तोडा, असा निर्णय आमदारांनी घेतला. मात्र, दुर्दैवाने उद्धव ठाकरे यांनी आमदारांऐवजी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना प्राधान्य दिले.
देवेंद्र फडणीस म्हणाले की, उद्धवजींनी राजीनामा दिल्यानंतर आम्ही महाराष्ट्राला अल्टरनेट गर्व्हमेंट देतोय. तसा शब्द आम्ही पूर्वीच दिला होता. शिवसेनेचा एक गट, अपक्ष आमच्यासोबत आहेत. तसे एक पत्र राज्यपालांना दिले आहे.
देवेंद्र फडणीस म्हणाले की, आम्ही सत्तेच्या पाठिमागे नाही आहोत. ही तत्त्वाची आणि हिंदुत्वाची लढाई आहे.
देवेंद्र फडणवीस यांना राज्यभाल भगतसिंह कोश्यारी यांनी पेढा भरवून शुभेच्छा दिल्या. राज्यपालांनी देवेंद्र फडणवीस यांना पेढा भरवला.ले.