देवरी, दि.२५- काल शुक्रवारी गोंदिया येथे शासकीय तंत्रनिकेतनमध्ये आयईडीएसएसए (आय झोन) विभागीय मुलांच्या खो-खो स्पर्धेमध्ये विभागातील १६ पॉलिटेक्निक व फार्मसी कॉलेजच्या संघांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये स्थानिक सी. एस. इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, देवरी संघाने स्पर्धेत अजिंक्य राहून विजेतेपदाची ट्रॉफी पटकावली.
या स्पर्धेतील रोमांचक फायनल मॅचमध्ये सी. एस. इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी च्या चमूने शासकीय तंत्रनिकेतन, गोंदिया विरुद्ध उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत ७ गड्यांची आघाडी घेत विजेतेपद पटकाविले. उत्कृष्ट कामगिरी करत विजेतेपद पटकाविल्याबद्दल सी. एस. इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी च्या चमूचे झामसिंग येरणे, अध्यक्ष, कृष्णा सहयोगी तंत्रशिक्षण संस्था, अनिलकुमार येरणे, सचिव, छत्रपती शिवाजी संकुलातील सर्व विभागांचे प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले व पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या