गोंदिया,दि.1 : महाराष्ट्रातील हरितक्रांतीचे प्रणेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व.वसंतराव नाईक यांचा 1 जुलै रोजी जयंती कार्यक्रम शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अधिष्ठाता डॉ.कुसूमाकर घोरपडे यांच्या प्रमुख उपस्थितीत अधिष्ठाता दालनात पार पडला. सदर जयंती कार्यक्रमात अधिष्ठाता यांनी वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी डॉ.कुसूमाकर म्हणाले, स्व.वसंतराव नाईक हे एक प्रगतीशील शेतकरी सुध्दा होते. त्यांचा शेती या व्यवसायाकडे पाहण्याचा दृष्टीकोन प्रगतीशील होता. त्यांनी मुख्यमंत्री असतांना शेतकऱ्यांसाठी अनेक शेतीपुरक योजना राबविल्या.
कार्यक्रमास डॉ.पटेरीया, राजु कुकडे, कार्यालयीन अधिक्षक, प्रशासकीय अधिकारी संजय भोंडे, ईश्वर डफरे, राजेश रंगारी, सचिन सालोडकर, राजेश रायपुरे, हरिष वाघमारे, अविनाश कान्हेरे, रोशन भगत, नितीन साखरकर, संदिप सोळंकी, परेश बोरसे, राहूल जाधव, राजेश सिध्दुसरे, विनोद जाधव, रोशन रामटेके, राजु महावत इत्यादी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाजसेवा अधिक्षक मारोती कुचनकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सचिन छोले यांनी सहकार्य केले.