गोंदिया,दि.03ः जिल्हा परिषद ग्रामसेवक सहकारी पतसंस्था र. नंबर 116 चि पाचवी आमसभा व गोंदिया जिल्हा ग्रामसेवक युनियन चे वार्षिक अधिवेशन मयूर लॉन कटंगी कला येथे मुख्य अतिथी मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील व उप मुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत खामकर, युनियन मानद अध्यक्ष कार्तिक चव्हाण यांचे प्रमुख उपस्थितीत जिल्हाध्यक्ष कमलेश बिसेन यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सदर सभेला जिल्ह्यातील सर्व ग्राम विकास अधिकारी व ग्रामसेवक उपस्थित होते.
मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांनी अधिवेशन प्रसंगी जिल्ह्यातील सर्व ग्राम विकास अधिकारी व ग्रामसेवक यांना सविस्तर मार्गदर्शन करून येणार्या काळात विकास कामे असताना येणार्या अडचणी सोडविणे करीता विशेष प्रयत्न करण्याची गरज असून शासनाचे प्रतिनिधी म्हणून ग्राम पंचायत पातळीवर नियमबाह्य कामे होऊ देऊ नये शासनाचा पैशाचा विनियोग केवळ नाली रस्ते बांधकाम पुरते मर्यादित न ठेवता मानवी विकास निर्देशांक वाढण्याच्या दृष्टीने आवश्यक बाबींवर खर्च करायला हवा. त्या पैश्याचा वापरातून केलेली विकास कामे लोकांच्या उपयोगी पडायला हवी. कामाचा प्रचंड व्याप वाढला असला तरी गावातील मूलभूत सुविधा वाढविणे करिता लोकांपर्यंत जनकल्याणकारी योजना पोहचवून अधिकाधिक लोकाभिमुख प्रशासन ठेवण्याचा प्रयत्न करावा. त्यासाठी जिल्हा प्रशासन नेहमीच ग्रामीण स्तरावर येणार्या अडचणी सोडविणे करिता मदत करेल असे मार्गदर्शन अनिल पाटील यांनी केले. तर उप मुख्य कार्यकारी अधिकारी जी. आर. खामकर यांनी ही प्रशासन अधिक पारदर्शक व गतिमान करणे करिता पूर्ण सहकार्य करून अधिकाधिक लोकांपर्यंत प्रशासन पोहोचविणे व लोकाभिमुख योजना प्रभावीपणे राबवून मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणेच्या दिशेने कार्य करण्याचे संदेश देऊन जिल्हा स्तरावर असणार्या प्रशासकीय प्रलंबित बाबी लवकर निकाली काढून एक पारदर्शी व गतिमान प्रशासन देण्याची गरज व्यक्त करून दाखविली. यावेळी जिल्हाध्यक्ष कमलेश बिसेन यांनी प्रास्ताविक मनोगत मध्ये जिल्ह्यात कार्यरत ग्रामसेवक ग्राम विकास अधिकारी ग्रामीण विकास कार्यात मोलाचा वाटा देत असून अतिशय विपरीत परिस्थितीत ही नेटाने लोकोपयोगी शासनाच्या योजना ग्रामीण जनते पर्यन्त पोहोचविण्याचे काम करीत असून पंतप्रधान आवास योजना असेल, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजना अंतर्गत मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे काम असेल या सर्वात जिल्ह्याची राज्य स्तर वर प्रगती असून इतरही मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या कामात जिल्ह्याला अग्रेसर ठेवण्यात मोलाची भूमिका बजावीत असून विकास कामाकरिता संवर्ग कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली. तसेच येणार्या विकास कामे व योजना मध्ये संवर्ग कडून काम करण्याच्या पद्धतीत मा. मुख्य कार्यकारी अधिकारी पाटील साहेब व उप मुख्य कार्यकारी अधिकारी खामकर साहेब यांचे मार्गदर्शनात अधिक पारदर्शी व गतिमान प्रशासन देण्याकरिता सुधारणा करण्याची ग्वाही यावेळी देण्यात आली.
ग्रामसेवक पतसंस्था आमसभा मध्ये यावेळी चर्चे अंती अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यात कर्ज मर्यादा वाढविणे, कर्ज व्याज दर कमी करणे, कुटुंब कल्याण निधी योजना सुरू करणे, उपविधी दुरुस्ती प्रस्ताव देणे, मयत सभासद कुटुंबाला तातडीची मदत करणे, अपघात विमा काढणे, इत्यादी महत्वपूर्ण सामाजिक उत्तरदायित्व ठेवणारे निर्णय सर्वानुमते सखोल चर्चे अंती घेण्यात आले.
सादर कार्यक्रमाचे प्रास्ताविक कमलेश बिसेन जिल्हाध्यक्ष यांनी केले तर संचालन कुलदीप कापगते जिल्हा सचिव, आमसभा संचालन भावेश चव्हाण संस्था यांनी केले तर आभार संस्था उपाध्यक्ष दयानंद फटिंग यांनी केले. सदर कार्यक्रम ला सचिन कुथे उपाध्यक्ष, भारती वाघमारे महिला उपाध्यक्ष, शैलेश परिहार कोषाध्यक्ष, योगेश रुद्रकर सहसचिव, वाय. एच. बिसेन, रजनी सहारे राज्य कौंसिलर, आर. आर. जमाईवार प्रसिद्धी प्रमुख, रितेश सहारे, संघटक, सुरेश वाघमारे, टीकाराम जणबंधू,जिल्हा संघटक, कायदे सल्लागार पी. जी. ठाकरे, किशोर आचके, नरेंद्र गोमासे, नम्रता रंगारी तसेच संचालक नरेंद्र अतकरी, निशा टेंभरे, ज्योती बिसेन, रविंद्र अंबाडे, सुनील पटले, सुरेंद्र निघोट, तारेश कुबळे, ओ. जी. बिसेन, सिंधु सूर्यवंशी व जिल्ह्यातील सर्व ग्रामसेवक ग्राम विकास अधिकारी उपस्थित होते.