
भंडारा : खून आणि अपहरणाच्या गुन्ह्यात न्यायालयीन बंदी असलेल्या कैदीने क्षुल्लक कारनाने आपल्या बैरेकमधील सहकैद्याचे जेवण वाढण्याच्या डवल्याने डोके फोडून जखमी केल्याची घटना भंडारा कारागृहात घडली आहे. मारहाण करणारा कैदी हा मानसिक रोगी असल्याचे सांगण्यात येत आहे.न्यायालयीन बंदी क्रमांक 84 असलेला राजू रविंद्र मारबते (वय 24) असे मारहाण करणाऱ्या आरोपी कैद्याचे नाव आहे. तर महादेव वाशिराम कारमोरे (वय 33) असे जखमी सहकैद्याचे नाव आहे. भंडारा कारागृहात पोलिस हवलदार पदावर असलेले फिरयादी शिवशंकर सहारे हे सर्व कैद्याना बैरेकमध्ये बंद करून बैरेकच्या बाहेर पेट्रोलिंग करीत होते. या दरम्यान त्यांना बैरेक क्रमांक 1 मधून कैद्याचा ओरडण्याचा आवाज आला. त्यांनी लागलीच डोकावून पाहाले असता न्यायालयीन बंदी महादेव वाशिराम कारमोरे यांच्या डोक्यातुन रक्त निघाल्याचे दिसले.अधिक माहिती घेतली असता आरोपी कैदी राजू मारबते याने क्षुल्लक कारणाने जेवन वाढण्याच्या डवल्याने वार करत डोके फोडून जखमी केले होते. लागलीच फिर्यादीने तुरुंग अधीक्षक यांना माहिती देत जखमी कैद्याला भंडारा सामान्य रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले. मारहाण करणारा आरोपी हा मानसिक रुग्ण असून त्यांच्या या आजारावर उपचार सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे. याची तक्रार भंडारा पोलिसात दाखल करण्यात आली असून भंडारा पोलिसांनी कलम 324 भादवी नुसार गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास सुरु आहे





