
सडक अर्जुनी,दि.14ः तालुक्यातील सौंदड निवासी सेवानिवृत्त जिल्हा व सत्र न्यायाधीश अशोक भैसारे यांचे सुपुत्र शुभम भैसारे यांनी केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) IAS परीक्षेत संपूर्ण देशातून 97 वी रँक मिळऊन घवघवीत यश संपादन केले.आणि भारताच्या नकाशावर गाव सौंदड,जिल्हा गोंदियाचे नाव लौकीक केले.
आज सौंदड येथे त्यांचे घरी जाऊन जि.प.उपाध्यक्ष इंजि.यशवंत गणविर यांनी शुभम भैसारे यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.यावेळी माजी जि.प.सदस्य रमेशभाऊ चुरे,माजी जि.प सदस्य किशोर भाऊ तरोणे,माजी पं.स.सदस्य दिनदयाल डोंगरवार,युवक तालुकाध्यक्ष राकापा राहुल यावलकर तसेच शुभमचे आई वडील,भाऊ आणि गावकरी मान्यवर उपस्थित होते.उपाध्यक्ष गणवीर यांनी शुभम भैसारे यांनी शिक्षण क्षेत्रात ज्याप्रमाणे परिश्रम घेतले व अभ्यासाचे नियोजन केले,त्याचेच अनुकरण इतर विद्यार्थ्यांनी करावे व आपले भावी जीवन उज्वल करण्याचे आव्हान सत्कार प्रसंगी केले.





