37.9 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home विदर्भ एकाच घरातून पवनारा येथे निघाले डझनभर साप

एकाच घरातून पवनारा येथे निघाले डझनभर साप

0
69

blank

तुमसर-एकाच घरातून एक दोन नव्हे तर चक्क एक डझन साप निघाल्याची घटना तुमसर  तालुक्यातील पवनारा येथे शनिवारी दुपारच्या सुमारास उघडकीस आली. एवढ्या मोठ्या प्रमाणात एकाच घरात साप निघाल्याची वार्ता पसरतात बघ्यांनी मोठी गर्दी केली.गोबरवाही जवळील पवनारा गावामध्ये विशाल रामेश्वर कांबळे यांच्या घरात शनिवारी दुपारी 2 वाजताच्या सुमारास नाग जातीचा साप आढळून आला. त्या पाठोपाठ स्वयंपाक घरात देखील तीन नागाचे दीड ते दोन फूट लांब पिल्ले दिसून आले. एकापाठोपाठ एक साप घरात दिसल्याने कुटुंबियांमध्ये एकच खळबळ उडाली. त्यांनी याची माहिती सर्पमित्र विकास तिडके व दुर्गेश भालाधरे यांना दिली. दोघांनीही तातडीने घटनास्थळ गाठून घरामध्ये सापांच्या शोध घेतला.
यावेळी पाच फूट लांब नाग दिसून आला.तर आणखी शोध घेतला असता नागाची तब्बल 11 पिल्ले सापडली. सर्पमित्रांनी मोठ्या शिताफीने सर्व सापांना पकडून बरणीत बंद केले. याची माहिती वनविभागाला देण्यात आली.यानंतर सर्व सापांना पकडून जंगलात सोडण्यात आले. घर परिसरात साप आढळून आल्यास त्यांना न मारता त्याची माहिती सर्पमित्रांना द्यावी व सापांना जीवदान द्यावे, असे आवाहन यावेळी सर्पमित्रांनी केले.

blank