37.1 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home विदर्भ हलबीटोला वार्ड क्रमांक 5 येथे स्वतंत्र राशन दुकानाची मागणी पूर्ण

हलबीटोला वार्ड क्रमांक 5 येथे स्वतंत्र राशन दुकानाची मागणी पूर्ण

0
38

blank

आमदार विजय रहांगडाले यांच्या पाठपुराव्याला यश

गोरेगाव,दि.18ः येथील नगरपंचायत अंतर्गत वार्ड क्रमांक 5 हलबीटोला येथे गेल्या अनेक महिन्यापासून असलेले रेशन दुकानाची मागणी आमदार विजय रहागंडाले यांच्या प्रयत्नाने पुर्ण झाली आहे.माजी नगराध्यक्ष इंजि.आशिष बारेवार यांनी यासंदर्भात नागरिकांची मागणी लक्षात घेत आमदार विजय रहागंडाले यांच्याकडे रेशन दुकानाची परवानगी मिळण्याबाबत निवेदन सादर केले होते.त्यानुसार आमदार रहागंडालेंनी तत्काळ तहसिलदार गोरेगाव यांना कारवाई करण्याचे निर्देश दिले होते.त्यावर हलबीटोला येथे नवे राशन दुकान मंजूर होऊन तेथील नागरिकांना राशन वाटपाला सुरुवात झाली आहे.यापूर्वी येथील नागरिकांना आपल्या हक्काच्या राशन घेण्याकरिता गोरेगाव येथे जावे लागत होते.जवळपास 5 ते 7 किलोमीटरचा प्रवास करून त्यांना आपल्या राशन उपलब्ध करून घ्यावा लागायचा तो वेळ आता त्यांचा वाचला आहे.हलबीटोला येथे सर्वराशन धारकांना एका राशन दुकानाला जोळून हलबीटोला येथे जाऊनच वाटप करण्याचे निर्देश देण्यात आले.त्यामुळे स्वस्त धान्य दुकानदार शैलेश मेश्राम यांनी आज प्रत्यक्षात राशन वाटपाला सुरुवात केली. यावेळी सामाजिक कार्यकर्ता विकास परिवार,अनिल राऊत हे सर्व उपस्थित होते.येथील रहिवासी व्यंकट पटले,दुलीचंद पटले,परमानंद चुलपार,दिलीप पटले,धर्मदास वासनिक,रामचंद्र लटये,ललित चुलपार,अफरोज शेख सर्वांनी प्रशासनासह आमदार रहागंडाले व माजी नगराध्यक्ष बारेवार यांचे आभार मानले.

blank