38.4 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home विदर्भ ओबीसी आरक्षणाच्या निर्णयाचे ओबीसी जनमोर्चा व पिछडा शोषित संघटनेने केले स्वागत

ओबीसी आरक्षणाच्या निर्णयाचे ओबीसी जनमोर्चा व पिछडा शोषित संघटनेने केले स्वागत

0
22

blank

यवतमाळ,दि.21ः ओबीसी आरक्षणाचा निर्णय न्यायाच्या बाजूने तर ओबीसीची संख्या अन्यायाच्या दिशेने असल्याचे मत ओबीसी जनमोर्चा व भारतीय पिछडा ओबीसी शोषित संघटनेच्या वतीने सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालावर व्यक्त करीत न्यायालयाच्या ओबीसी आरक्षणाचे स्वागत केले आहे.या निर्णयाचा स्थानिक यवतमाळ शहरातील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.परंतु मंडल आयोगाने त्याच्यापूर्वी काका कालेलकर आयोगाने ओबीसीची लोकसंख्या ही 52 टक्के दर्शवली होती.आणि आता जर 37% दर्शवत आहे हा ओबीसी सोबतचा धोका आहे, ही भूमिका आपण आता समजून घेतली पाहिजे. याकरीता न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करत जनजागृती करणे महत्त्वाचे आहे असे आवाहन डॉक्टर ज्ञानेश्वर गोरे ,विलास काळे ,उत्तम गुल्हाने ,इंजिनीयर संतोष झेंडे ,रवी नागरिकर, शशिकांत फेडर, सागर काळे ,नरेंद्र भांडारकर संजय बारी ,बर्डे काका शशिकांत लोळगे सदानंद बोपींवार, संदीप कोरडे ,अशोक दिखे प्रियंका गोरे , ललिता वाघ,मनोज पाचघरे ,महेंद्र पिसे ,माया गोरे विनायक खेरडे दीपक वाघ रमेश गिरोरकर डॉक्टर दीपक शिरभाते ,मोहम्मद आरिफ अन्सारी यांनी आनंदोत्सव साजरा करीत केले.यावेळी जन आंदोलन चालवणारे डॉक्टर ज्ञानेश्वर गोरे व विलास काळे यांचा सन्मान याप्रसंगी करण्यात आला.ओबीसी जनम मोर्चाच्या वतीने लाडू वाटपाचा ही कार्यक्रम झाला.

blank