
तिरोडा,दि.5 : स्थानिक सिंगाडा तलावाचे सौंदर्यीकरणाचे भूमिपूजन व तिरोडा नगर परिषदेने निर्माण केलेल्या नवनिर्मित सभापती कक्षाचे लोकार्पण खा.प्रपुâल पटेल यांचे हस्ते, आ.राजेंद्र जैन, न.प.अध्यक्ष अजय गौर, उपाध्यक्षा ममता बैस, डॉ. अविनास जायस्वाल, माजी आ.दिलीप बन्सोड, जि.प.सदस्या राजलक्ष्मी तुरकर, पं.स.सभापती उषा विंâदरले, माजी नगराध्यक्ष नरेश वुंâभारे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी खा.पटेल यांनी सांगितले की, तिरोडा शहरात शंभर टक्के घरकुल झाले असून त्याचे श्रेय इथून पाठपुरावा झाल्याने इथल्या मंडळींना जाते. अदानी प्लाँट आणला, धापेवाडा बॅरेजवर पाणी भरलेला आहे. वाटपाची व्यावस्था करा, धानाचे भाव २८०० वरून १८०० रुपयावर आलेत. कुठे गेले शेतकNयांचे वैâवारी नुसते भूमिपूजन करून चालणार नाही, उद्घाटनही झाली पाहिजे, कामे झाली पाहिजे, असे यावेळी मार्गदर्शन केले तर प्रास्ताविकातून नगराध्यक्ष गौर यांनी ७.३३ करोड रुपयाचे सौदर्यीकरणात कशाचा समावेश असेल यावर सविस्तर माहिती दिली तर आ.राजेंद्र जैन, माजी आ.दिलीप बन्सोड यांनीही मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे संचालन संदिप खनंग आभार प्रदर्शन मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे यांनी केले. यशस्वीतेसाठी न.प. सभापती ओमप्रकाश येरपुडे, अर्चनादेवी जायस्वाल, जोशना शेंडे, माजी अध्यक्षा राखी गुणेरिया, सदस्या देवका उरकुडे, शाहीन मिर्झा, छायाताई कटरे, ममता हट्टेवार, राजश्री उपवंशी, विजय बन्सोड, सलीम जवैरी, अशोक असाटी, नरेश धुर्वे, प्रशांत डहाटे, जिब्राईल खॉ पठाण, रामकुमार असाटी तसेच कर्मचारी वृंद व प्रतिष्ठीत नागरिक यांनी मोलाचे सहकार्य केले.


![IMG-20160205-WA0205[1]](https://www.berartimes.com/wp-content/uploads/2016/02/IMG-20160205-WA02051-e1454682906831.jpg)


