
गोंदिया,दि.24: ओबीसी, व्हीजेएनटी आणि एसबीसी विद्यार्थ्यांना ‘मंडल आयोगाबाबत जागृती करीत त्यांना त्यांचे अधिकार आणि हक्क समजावून सांगण्यासाठी ‘मंडल दिनानिमित्त विदर्भातील सात जिल्ह्यात मंडल आयोग जनजागृती यात्रा निघणार आहे.या यात्रेचे आगमन गोंदिया जिल्ह्यात 2 आँगस्ट रोजी होणार असून गोंदियाच्या मयुर लाँन कटंगी(कला)येथे ओबीसी पदाधिकारी,कार्यकर्ता,युवक,विद् यार्थी,अधिकारी कर्मचारी यांची सभा आयोजित करण्यात आली आहे. शनिवार(दि.23)ला येथील जयस्तंभ चौकातील ओबीसी संघर्ष कृती समितीच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत मंडल यात्रेच्या स्वागतासंबधी नियोजन बैठक ओबीसी संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष बबलू कटरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.यात यात्रेचे तिरोडा तालुक्यात स्वागत करणे,गोंदियात सायकांळी 5 वाजता मयुर लाँन येथे मार्गदर्शन सभा घेणे,3 आँगस्टला गोंदिया,गोरेगाव,सडक अर्जुनी,नवेगावबांध येथे विद्यार्थी,युवक,ओबीसी बांधवाना मार्गदर्शन कार्नरसभा घेण्याचे ठरविण्यात आले.या बैठकिला ओबीसी संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष बबलू कटरे,ओबीसी अधिकार मंचचे सयोंजक खेमेंद्र कटरे,ओबीसी सेवा संघाचे सी.पी.बिसेन,सर्वसमाज ओबीसी मंचाचे तिर्थराज उके,मुकेश शिवहरे,सुरेश पिपलेवार,संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष सुनिल तरोणे,ओबीसी संघर्ष समितीचे शिशिर कटरे,कैलास भेलावे,मनोज ड़ोये,सुनिल पटले,बहुजन युवा मंचचे सुनिल भोंगाडे,ओबीसी संग्राम परिषदेचे राजीव ठकरेले,भारतीय पिछडा शोषित संघटनेचे प्रेमलाल साठवणे,चुनेश पटले,श्री भजे,प्रमोद बघेले,आदी उपस्थित होते.





