43.5 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home गुन्हेवार्ता चिल्हाटी जिल्हा परिषद शाळेत चोरी

चिल्हाटी जिल्हा परिषद शाळेत चोरी

0
94

blank

ककोडी(देवरी),दि.२७– चिचगड पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या चिल्हाटी(ककोडी) येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेचा अज्ञात चोरांनी कुलूप कापुण दोन एलईडी संच चोरुन नेल्याची घटना आज उघडकीस आली.चोरट्यांनी आरींनी कुलूप कापल्याचे निदर्शनास आले आहे. प्रयोग शाळेच्या रुममध्ये लावलेले दोन 32 इंच L E D, टि.व्ही.सचं चोरून नेल्याचे व शाळेत चोरी झाल्याची घटना आज सकाळी ०९.३० वाजे शाळेत आलेल्या विद्यार्थाना समजले.त्यानी तत्काळ शिक्षकांना आणि गावकर्याना माहिती दिली.शिक्षक शाळेत पोहोचल्यानंतर लगेज पोलिस पाटील व गावकर्यासोबत शाळेची पाहणी केली असता कार्यालयाचे कुलूप अर्धवट कापलेला आढळला.चोरीची तक्रार शाळेच्या मुख्याधापिका श्रीमती किरण सलामे, सहा.शिक्षक चौरागडे  यांनी पोलिस स्टेशन चिचगड़ येथे दिली.गेल्या काही महिन्यापासून ककोडी परिसरात चोरीच्या घटनांत सातत्याने वाढ होत असल्याने पोलिसांचा धाक राहिला नसल्याचे बोलले जात आहे.

blank