34.7 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home गुन्हेवार्ता खोबाजवळील अपघातात भजियापार/नवेगावातील चौघांचा मृत्यू

खोबाजवळील अपघातात भजियापार/नवेगावातील चौघांचा मृत्यू

0
296

blank

गोंदिया,दि.28ः आमगाव तालुक्यातील नवेगाव/भजियापार येथील चार युवक हे अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध येथील सोलरपंप फिटिंगचे काम करुन घराकडे रात्रीला परत येत असताना 27 जुर्लेच्या रात्री 11 वाजेच्या सुमारास डुग्गीपार पोलिसस्टेशन अंतर्गत येत असलेल्या खोबा गावाजवळ झालेल्या कारच्या अपघातात चौघा मित्रांचा मृत्यू झाल्याची घटना घडली.या मृतामध्ये रामकृष्ण योगराज बिसेन वय 24,सचिन गोरेलाल कटरे, वय 24,संदिप जागेश्र्वर सोनवाने वय 18 आणि वरुण निलेश तुरकर वय 27 यांचा समावेश आहे.सदर चारचाकी वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात होऊन या चौघांचाही जागेवरच अपघाती मृत्यू झाला आहे.blank

blank