36.6 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home Top News नमस्ते मॅडम, सावध रहा:काही लोक आपला पाठलाग करीत आहेत, शुभचिंतकाने पत्र पाठवत...

नमस्ते मॅडम, सावध रहा:काही लोक आपला पाठलाग करीत आहेत, शुभचिंतकाने पत्र पाठवत राणा यांना दिला सूचक इशारा

0
74

blank

अमरावती-महाराष्ट्रातील अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या जीवाला धोका असल्याची माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे. नवनीत राणा यांना एका हितचिंतकाने पत्र लिहून याबाबत सावध केले आहे. राजस्थानच्या सीमेवरून काही संशयित लोक अमरावतीत दाखल झाल्याचा दावा त्याने पाठवलेल्या पत्रात केला आहे.

काय म्हटलं पत्रात?

‘नमस्ते मॅडम, मी तुम्हाला माझे नाव सांगू शकत नाही. मी तुमच्याच शहरातील एक सामान्य नागरिक आहे. तुम्ही थोडे सावध रहा, याबाबत मी तुम्हाला सावध करु इच्छितो. काही लोक आपला पाठलाग करीत आहेत. माझ्या अनेक कामात तुम्ही मला मदत केली आहे. मी सरकारी नोकर करतो. तुम्ही माझी बदलीही केली आणि माझ्या वडिलांना कोरोनामध्ये खूप मदत केली. राजस्थान सीमेवरून काही संशयित लोक अमरावतीत आले आहेत. ते लोक तुमच्या घरीही येऊन गेले असल्याची माहिती मला मिळाली आहे. मी अल्लाकडे एवढीच प्रार्थना करेन की तुमच्यासोबत काहीही अनुचित प्रकार घडू नये आणि तुमची प्रगती कायम व्हावी. खुदा हाफिज, असे पत्रात लिहले आहे.

blank

उमेश कोल्हे खून प्रकरणात धमकी?
मेडिकल स्टोअर चालवणारे उमेश कोल्हे यांची 21 जून रोजी रात्री अमरावती येथे निर्घृण हत्या करण्यात आली होती. भाजप नेत्या नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. याप्रकरणी पोलिसांनी अनेक आरोपींना अटकही केली. मात्र, नवनीत राणा यांनी अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंगवर प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत केला होता. योग्य तपासणी होत नसल्याने या प्रकरणाचा तपास केंद्रीय तपास यंत्रणांकडे करण्याची मागणी राणा यांनी केली होती. तेव्हापासून नवनीत राणाला अशा धमक्या येत आहेत.

हनुमान चालीसा प्रकरणामुळे खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा चर्चेत आले होते. राणा दाम्पत्याने उद्धव ठाकरेंना घराबाहेर हनुमान चालीसा वाचण्याचे आव्हान दिले. या प्रकरणाने बराच काळ ते माध्यमांतही गाजले होते. आगामी काळात नवनीत राणा यांच्यावर केंद्रात भाजपकडून मोठी जबाबदारी सोपवली जाऊ शकते, अशीही शक्यता वर्तवली जात आहे. राणा दाम्पत्य शिवसेनेच्या विरोधात उभे ठाकले आहे. सध्या नवनीत राणा अमरावतीत नसून मुंबईत आहेत. नवनीत राणा यांच्या घरी आलेले पत्र हिंदीत असून ते कुणी पाठवलं आहे याची कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही.

blank