
नाशिक – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले. ज्यातून राज्यपालांनी महाराष्ट्रासह मुंबईचा अपमान केलयाचं म्हणत विरोधकांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला जात आहे. यामुळे राज्यातील राजकीय वातावरण देखील ढवळून निघाले आहे. राज्यपालांच्या याच वक्तव्यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. राज्यपाल कोश्यारींचे विधान वैयक्तिक आहे. मात्र त्यांच्या विधानाशी सहमत नाही अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री शिंदेंनी दिली आहे. मराठी माणसाच्या कष्टामुळे मुंबई उभी आहे आणि याचे श्रेय कोणाला घेता येणार नाही असंही मुख्यमंत्र्यांनी ठणकावून सांगितले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक दौऱ्यावर असून यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
👉👉मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, राज्यपाल कोश्यारींचे विधान वैयक्तिक आहे. त्याच्याशी मी सहमत नाही, मुंबईच्या विकासात मराठी माणसाचे योगदान ते कोणी नाकारू शकत नाही, उद्योग धंद्यात त्यांचे जे काम आहे ते कोणालाही नाकारता येणार नाही, मुंबईसाठी 106 मराठी माणसांच्या बलिदानामुळे मुंबई मिळाली आहे. यात हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे योगदान सर्वांना माहित आहे. मराठी माणसामुळे मुंबईला वैभव नावलौकिक प्राप्त झालं आहे. आज उपमुख्यमंत्री आणि राज्यपालांनी खुलासा केला आहे.
👉👉कोणाचाही अवमान होणार नाही याची काळजी घ्या,👉 मुख्यमंत्र्यांचा राज्यपालांना सल्ला
राज्यपाल हे मोठं पद आहे. ते राज्याचं एक प्रमुख, संविधानिक पद आहे. त्यामुळे कोणाचाही अवमान होणार नाही याची काळजी त्यांनी घेतली पाहिजे. असा सल्लाही शिंदेंनी राज्यपालांना दिला आहे.
👉👉मुंबईचे श्रेय इतर कोणाला घेता येणार नाही
मुंबईत मराठी माणसाचे त्याग, योगदानाचे अवहेलना, अवमान करता येणार नाही. मुंबईसाठीचे मराठी माणसाचे योगदान कोणालाही नाकारता येणार नाही, मराठी माणसाच्या मेहनतीवरचं मुंबई देशाची आर्थिक राजधानी बनली आहे. त्यामुळे मुंबईत इतर राज्यातील लोकं रोजगार करतात. इतर समाजाचे लोकंही इथे व्यवसाय व्यापार करतात. पण मुंबईचे जे महत्त्व आहे त्यामुळेचं हे शक्य आहे. याचे श्रेय इतर कोणाला घेता येणार नाही. त्यामुळे मुंबईत मराठी माणसाने जी अस्मिता जपली आहे त्याचा अवमान करता येणार नाही, बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापनाच मराठी माणसाला न्याय, हक्क मिळून देण्यासाठी केली. त्यामुळे या मुंबईवर अनेक प्रसंग आले, संकट पाहिली आहे. पण या संकट काळात शिवसेना पक्षप्रमुख मुंबईच्या बाजूने उभे राहिले. असही एकनाथ शिंदे म्हणाले.
👉👉अशाप्रकारे वक्तव्य करण्याचा कोणालाही अधिकार नाही
मुंबई कितीही संकट आली तरी थांबत नाही, 24 मुंबई चालू असते. लाखो, करोडो लोकांना मुंबई रोजगार देते. अनेकांचा पोटा पाण्याचा प्रश्न सुटत असतो. त्यामुळे अशाप्रकारे वक्तव्य करण्याचा कोणालाही अधिकार नाही, शिवसेना म्हणून राज्यपालांच्या विधानाशी सहमत नाही, ते विधान आम्हाला मान्य नाही. अशी स्पष्ट भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडली.
👉👉यावेळी मुख्यमंत्र्यांनी नाशिक दौऱ्यातील विविध विकासकामांचा आढावा घेतला आहे. राज्यात शिवसेना- भाजप युतीच सरकार स्थापन झाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक लोकहिताचे निर्णय घेण्यास सुरुवात केली, त्याचाच एक भाग म्हणून आम्ही शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले, पेट्रोल- डिझेलचे भाव कमी केले. दुष्काळी भागात पाणी वळवण्याचे काम केले. त्यातल्या त्यात शासन आपल्या दारी अशी प्रकारचा प्रयत्न, तातडीने त्याच ठिकाणी बैठका झाल्या सर्व अधिकारी, लोकप्रतिनिधी तिथे असतात. तिथेच सर्व अधिकारी असल्याने एकाच विभागाचा दुसऱ्या विभागाशी संलग्न प्रश्न तिथल्या तिथे सोडवला जातो. त्यानुसार नाशिक विभागातील पाच जिल्ह्यांची आढावा बैठक पूर्ण झाली आहे.
👉👉पोलिस भरती सुध्दा लवकरचं निघणार आहे. लोकांच्या हिताचे सगळे निर्णय आम्ही घेणार आहोत. राज्यात जिथं-जिथं अडचण आहे, तिथं सरकार मदत करणार आहे. आरोग्य विभाग, कृषी विद्यापीठं सक्षम करण्यावर आमचा अधिक भर आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
👉👉मुंबईतून गुजराती, राजस्थानी गेल्यास ही आर्थिक राजधानी राहणार नाही; राज्यपालांचे वादग्रस्त विधान; विरोधक आक्रमक





