
गोंदिया,दि.03ः- ओबीसी,व्हीजेएनटी,एसबीसी समाज जनजागृती अभियानांतर्गत ओबीसी अधिकार युवा मंच,संघर्ष वाहिनी,ओबीसी अधिकार मंचच्यावतीने 1 आँगस्टपासून निघालेल्य मंडल यात्रेचे 2 आँगस्टला गोंदिया जिल्ह्यात आगमन झाले.या यात्रेच्या तिसर्या दिवशी 3 आँगस्टला गोंदियातील फुलचूर स्थिती फुंडे सायंस काॅलेज येथील विद्यार्थ्यांशी मंडल यात्रेतील सहभागी सयोंजकानी संवाद साधून त्यांना ओबीसींच्या विविध योजनांची व मंडल आयोगाची माहिती दिली.
फुंडे सायन्स कॉलेज फुलचूरच्यावतीने महाविद्यालय परिसरात मंडल यात्रेचे स्वागत करण्यात आले. मंडल यात्रेतील सहभागी सयोंजक मार्गदर्शकांनी ओबीसी, VJNT, SBC, SC, ST, GEN च्या विद्यार्थ्यांना महाज्योती,सारथी,बार्टी,टार्टी, अमृत आणि केंद्र सरकारच्या SEED योजनेसह इतर अभ्यासक्रमांची माहिती उमेश कोराम यांनी दिली.तसेच मंडल आयाेगात ओबीसींच्या हिताचे काय निर्णय याबद्लही माहिती देण्यात आली.यावेळी मुकुंद अडेवार, खेमेंद्र कटरे,धीरज भिसिकर,दीनानाथ वाघमारे,संजीव भुरे,सुनील पटले,कैलाश भेलावे,सुनील भोंगाड़े,परेश दुरूगवार,राजेश नागरिकर,अनिल रहागंडाले आदी उपस्थित होते.उपस्थित मान्यवरांना फुंडे सायंस काॅलेजच्यावतीने वृक्ष भेट देऊन प्रभारी प्राचार्य रितेश गजभिए, प्रा.सौ. कांचन (शर्मा)मेंढे, अधीक्षक प्रकाश पाथोडे, प्रा.सौ. महेक आसुदानी, प्रा.पंकज ठाकरे, प्रा.गिरिजाशंकर पटले,प्रा.रविंद्र मस्करे,विनोद मत्ते यांनी स्वागत केले.संचालन कु. सुहानी ठाकरे व आभार रोहीत नागपूरे यांनी मानले.