
यवतमाळ :- मंडल यात्रेच्या स्वागताचे नियोजन लॉर्ड बुद्धा सभागृहामध्ये होणार असून ओबीसी समूहात आपल्या हक्क अधिकारात जागृती निर्माण व्हावी या उद्देशाने भारतभर मंडल यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही मंडल यात्रा १ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट च्या दरम्यान नियोजन करण्यात आले असून मंडल जागृती यात्रेचे यवतमाळला 5 ऑगस्ट 2022 रोजी दुपारी ४ वाजता आगमन होत आहे. हि मंडल जागृती यात्रा महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन करून सदर रॅली ही लॉर्ड बुद्धा सभागृह संविधान चौक या ठिकाणी सायंकाळी ०६:३० वाजता येणार आहे. या ठिकाणी ओबीसी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय पिछडा (ओबीसी) शोषित संघटनेचे अध्यक्ष, ओबीसी जन मोर्चाचे उपाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर गोरे,प्रमुख अतिथी ओबीसी नेते डॉ. दीपक शिरभाते, सामाजिक कार्यकर्ते उत्तम गुल्हाने, ओबीसी जन मोर्चाचे उपाध्यक्ष विलास काळे, विदर्भ अध्यक्ष सुनिता काळे हे राहतील, मंडल यात्रेचे प्रमुख उमेश कोराम व त्यांचे सर्व सहकारी या कार्यक्रमांमध्ये उपस्थित राहणार आहे ,याप्रसंगी प्रा. सविता हजारे ,ज्ञानेश्वर रायमल ,संजय राजूरकर ,अतुल झोपाटे,विठ्ठल नागतोडे, वासुदेव खेरडे, दिलीप बेलसरे, संजय बारी, इंजि. संतोष झेंडे, अरुण कपिले,पवन काजळे आदिंनी अयोजन केले आहे. या मंडल जागृती यात्रेच्या कार्यक्रमाला ओबीसी बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन ओबीसी जनम मोर्चा, भारतीय पीछडा ओबीसी शोषित संघटन ,सत्यशोधक महिला विचार मंचच्या वतीने कल्याणी मादेश्वार , नीता दरणे , अनिता गोरे , वैशाली फुसे , ज्ञानेश्वर रायमल , अशोक मोहूरले , मायाताई गोरे कमलताई खंडारे , दीपक वाघ , संजय बारी , माधुरी फेंडर वासुदेवराव खेरडे , विनोद इंगळे , दिलीप बेलसरे अतुल झोपाटे , अरुण कपिले या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.





