
#भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील घटना
#प्रकरणात दोन आरोपीला अटक.एक फरार
शिवसेनेच्या प्रवक्त्या ड़ाॅ.मनिषा कायंदे घेणार पिडितेची भेट
गोंदिया :- महाराष्ट्र राज्यात महिलांच्या असाह्यतेचा लाभ घेत आरोपींनी मदतीचे आश्वसान देऊन भंडारा व गोंदिया
जिल्ह्याच्या विविध ठिकाणी ३५ वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याची घटना घडली असून अत्याचारानंतर तिला मुख्य मार्गावरील पुलानजीकच्या रस्त्याकाठी फेकून दिल्याची घटना शुक्रवारला उघडकीस आली. पीडितेवर ते सध्या नागपुर
वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु आहेत. पोलिसांनी या प्रकरणी दोन आरोपीना अटक केली असून एक आरोपी फरार आहे.दरम्यान भाजप प्रवक्त्या चित्रा वाघ यांनी पिडितेची भेट घेतली असून आज रविवारला शिवसेनेच्या प्रवक्त्या डाॅ.मनिषा कायंदे पिडितेची भेट घेत भंडारा पोलिस अधिक्षकांना निवेदन देणार आहेत.
गोंदिया जिल्ह्यात घडल्याने भंडारा पोलिसांनी संबधित गुन्हा गोंदियाच्या गोरेगाव पोलिसाना कडे वर्ग केला आहे.
गोरेगाव तालुक्यातील कमरगाव या ठिकणी आई कड़े जाणाच्या मार्गाने निघाली असता अज्ञात आरोपीने तिला घरी सोडून देण्याचे सांगत तिचा विश्वासघात केला.तिला चारचाकी वाहनात बसवत मुंडीपार जंगलात नेऊन 30 जुलैला पाशवी अत्याचार केला.तर दुसऱ्यांदिवशी ३१ जुलैला पळसगांव जंगलात नेऊन अत्याचार करीत पीडितेला ते जंगलात सोडून देत आरोपीने पळ काढला. दरम्यान पीड़िता जंगलातून निघुन भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील कन्हाळमोह गावातील धर्माढाब्यावर पोहचली असता तिथे दुचाकी दुरुस्त करणाऱ्या आरोपी क्रमांक दोन सोबत भेट झाली.त्यानेही घरी सोडून देण्याच्या मदतीच्या नावावर आरोपीने आपल्या मित्रासोबत 1 अगस्त रोजी तिला मदतिच्या आमिष देऊन पांशवी अत्याचार केला.अत्याचारानंतर कारधा पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या कन्हाळमोह गावच्या पुलाजवळ सकाळी ८ वाजता दरम्यान विवस्त्र अवस्थेत सोडून पळ काढले असता पीडिता हि नागरिकांना दिसताच कारधा पोलिसाना याची
माहिती दिली.पोलिसांनी महिलेला भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले.वैद्यकीय तपासणी केली असता
महिलेवर अत्याचार झाल्याचे उघडकीस येताच . महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याने तियाच्यावर प्राथमिक
उपचार भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात करीत पुढील उपचाराकरिता नागपुरातील वैद्यकीय महाविद्यलयात
हलविले.पीडितेच्या माहितीनुसार भंडारा जिल्ह्याच्या कारधा पोलिसांनी दोन आरोपीना अटक केली असून
आरोपी विरुद्ध कलम ३७६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास कारधा पोलिस करीत
आहेत.प्रकरणात संपूर्ण गुन्हात 3 आरोपीचा समावेश असल्याने आता फक्त 2 आरोपी भंडारा पोलिसांनी अटक
केली आहे. तर या गुन्हाची सुरुवात गोंदिया जिल्ह्याच्या गोरेगाव येथे झाल्याने. भंडारा पोलिसांनी गोरेगाव
पोलिसांना 2 संशयित आरोपीसह गुन्हाचा तपास वर्ग केला आहे. सध्या दोन्ही आरोपीना गोरेगाव पोलिसांच्या
ताब्यात दिले असून फरार आरोपी चा शोध गोंदिया पोलिस घेत आहेत अशी माहिती पोलीस अधिक्षक विश्व पानसरे यांनी माहिती दिली.





