35.8 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home विदर्भ क्रांतीदिनी नऊ ऑगस्टला नागपूर येथे लाँग मार्च व धरणे आंदोलन

क्रांतीदिनी नऊ ऑगस्टला नागपूर येथे लाँग मार्च व धरणे आंदोलन

0
20

blank

चंद्रपूर,दि.08ः  स्वतंत्र राज्य विदर्भ राज्याचे रणसिंग फुंकण्यासाठी नागपूर येथे क्रांतिदिनी ९ ऑगस्ट २0२२ रोजी दुपारी एक वाजता भव्य लाँग मार्च व धरणे आंदोलन होणार आहे. हा लाँग मार्च गांधी पुतळा व्हेरायटी चौक येथून निघून संविधान चौक नागपूर येथे आल्यानंतर धरणे आंदोलन होणार आहे. या आंदोलनाला विदर्भातील नागरिकांनी मोठय़ा संख्येने सहभागी होऊन वेगळ्या विदर्भाचा आवाज बुलंद करावा, असे आवाहन विदर्भ राज्य आंदोलन समितीने केले आहे.
विदभार्चा सर्वांगीण विकास, नक्षलवादाला आळा, प्रदूषण व कुपोषण संपविणे आणि बेरोजगार, शेतकरी, व्यापारी, महिला, तरुण या सर्वांना विदर्भातील त्यांच्या हक्काचा न्याय्य वाटा मिळावा आणि विदर्भा वरील अन्याय दूर व्हावा, यासाठी स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती हाच एकमेव पर्याय असून विदर्भ राज्य आंदोलन समितीने विदर्भ राज्य निर्मिती मिशन २0२३ अंतर्गत या आंदोलनाचे आयोजन केले आहे. समितीच्या प्रमुख मागण्या केंद्र सरकारने विदभार्चे स्वतंत्र राज्य तात्काळ निर्माण करावे, विजेची दरवाढ राज्य सरकारने तात्काळ मागे घ्यावी, अन्नधान्यावरील जी.एस.टी. तात्काळ रद्द करावी, पूर, अतवृष्टी व ढग फुटीमुळे विदभार्तील शेतकर्‍यांच्या पिकांचे नुकसान झाल्याने हेक्टरी ७५ हजार रुपये तत्काळ मदत जाहीर करावी, या प्रमुख मागण्या या आंदोलनाद्वारे करण्यात येणार आहे.
या आंदोलनात चंद्रपूर जिल्ह्यातील विदर्भवादी कार्यकर्ते, नागरिक यांनी मोठय़ा संख्येने सहभागी होऊन स्वतंत्र विदभार्साठी आपला आवाज बुलंद करावा, असे आवाहन विदर्भ राज्य आंदोलन समितीचे नेते माजी आ. अँड. वामनराव चटप, प्रकाश पोहरे, महिला आघाडी अध्यक्ष रंजना मामर्डे, अर्थतज्ज्ञ डॉ.श्रीनिवास खांदेवाले, युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष मुकेश मासुरकर, अरूणभाऊ केदार, कोर कमेटी सदस्य अँड.मोरेश्‍वर टेमुर्डे, अरुण पाटील नवले, नीळकंठ कोरांगे, किशोर दहेकर, हिराचंद बोरकुटे, अँड.फरहाद बेग, रमेश राजूरकर, नितीन भागवत, कपिल इद्दे, अंकुश वाघमारे, अँड. चैताली कटलावार, सुदाम राठोड, सारिका उराडे, गोपी मित्रा, अनिल दिकोंडवार, बंडू राजूरकर, अँड. श्रीनिवास मुसळे, रमाकांत मालेकर, शेषराव बोंडे, र%ाकर चटप, अविनाश मुसळे, नरेश सातपुते, प्रभाकर ढवस, रमेश नळे, दिलीप देरकर, पंढरी बोंडे, दिनकर डोहे आदींनी केले आहे.

blank