
कुरखेडा- कोरोना काळापासून कोरची नागपूर बस बंद असल्याने अनेक नागरीक व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. विद्यार्थ्यांना व नागरिकांना मानसिक शारीरिक व आर्थिक त्रास होत आहेत. याकडे वेळीच लक्ष घालून कोरची नागपूर बस तात्काळ सुरू करावी, अशी मागणी भाजयुमोच्या पदाधिकार्यांनी विभाग नियंत्रक अशोककुमार वाडभिस्मे यांच्याकडे निवेदनातून केली.
सदर बससेवा सुरू झाल्यास कोरची, पुरादा, हेटीनगर, रामगड , दादापूर, लेंडारी जांभुळखेडा, येरंडी, या मार्गावरून कुरखेडा तालुक्यात येणारे शेकडो विद्यार्थी व हे शिक्षणापासून वंचित राहणार नाही व त्यांच्या वर आर्थिक बोजा पडणार नाही. याची खबरदारी घेऊन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ गडचिरोली विभागांनी घेऊन कोरची-नागपूर बससेवा तत्काळ सुरू करून विद्यार्थ्यांची होणारी आर्थिक पिळवणूक थांबवावी. तसेच तालुक्यातील आवश्यक ठिकाणी मानव विकास मिशनच्या बसेस तात्काळ सुरू करावे, अशी एक मुखी मागणी कुरखेडा भारतीय जनता युवा मोर्चाच्या शिष्टमंडळाने केली आहे. यावेळी भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष चांगदेव फाये, भाजप तालुका अध्यक्ष विनोद नागपूरकर, भाजयुमो जिल्हा सचिव प्रशांत हटवार, तालुका महामंत्री उल्हास देशमुख, युवा सदस्य सोयब पठाण उपस्थित होते .
यावेळी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ गडचिरोली विभाग नियंत्रक अशोक कुमार वाडीभस्मे यांनी आम्ही लवकरच कोरची- नागपूर बसेस ही सुरू करू असे आश्वासन भारतीय जनता युवा मोर्चाच्या शिष्टमंडळाला दिले. यावेळी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ गडचिरोली येथील अधिकारी सोनी लिचडे, अनंत धारणे उपस्थित होते.





