29.7 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home गुन्हेवार्ता महिलेवरील सामूहिक अत्याचार प्रकरणातील युवकाच्या शाेधासाठी स्केच तयार

महिलेवरील सामूहिक अत्याचार प्रकरणातील युवकाच्या शाेधासाठी स्केच तयार

0
138

blank

गोंदिया,दि.10ः भंडारा-गोंदिया जिल्ह्यात एका महिलेवर झालेल्या अत्याचार प्रकरणी भंडारा पाेलिसांनी दाेघांना अटक केली आहे. तिसरा संशयिताचा शाेध सुरु असून पाेलिसांनी आता या प्रकरणात नागरिकांची मदत घेण्याचे निश्चित केले आहे. त्यानूसार पाेलिसांनी तिस-या संशयित आराेपीचे स्केच तयार करुन ते जनतेपर्यंत पाेहचविले आहे.पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार संबंधित महिलेवर दोन वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार झाला. या प्रकरणी लुखा उर्फ अमित सार्वे व मोहम्मद एजाज अंसारी याला अटक करण्यात आले आहे. या दाेन्ही संशयित आराेपींना गोंदिया जिल्ह्याच्या गोरेगाव पोलिसांकडे सुपुर्द करण्यात आले आहे.दरम्यान या प्रकरणातील तिसरा संशयित आरोपी शाेधण्यासाठी एसआयटीनं तपासाची चक्रे फिरवली आहेत. आज एसआयटीनं पीडितेचा माहितीवरुन तिसऱ्या संशयित आरोपीचा स्केच तयार केला. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार संबंधिताचे वय 30 ते 40 वर्ष असुन दिसायला सावळा रंगाचा व मध्यम बांधा, केस काळे, हलकी दाढ़ी, डाव्या हातात जर्मनच्या कड़ा, डाव्या हाताच्या बोटामध्ये दोन-तीन अंगठ्या, पांढरा रंगाचा शर्ट, काळ्या रंगाची फुलपॅंट घटनेवेळीस त्यांनी परिधान केली हाेती. त्यानूसार तयार स्केच करण्यात आले असून कुणाला आढळल्यास माहिती देण्याचे आवाहन गोंदिया स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक बबन आव्हाड यांनी आवाहन केले आहे.

blank