41.4 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home राजकीय तात्काळ सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना मदत करा-राष्ट्रवादीचे निवेदन

तात्काळ सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना मदत करा-राष्ट्रवादीचे निवेदन

0
38

blank

देवरी,दि,12 :-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी देवरीच्या वतीने मा. मुख्यमंत्री महा. शासन यांना उपविभागीय अधिकारी देवरी यांचे मार्फत देवरी तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण तात्काळ करून शासकीय मदत करण्याचे निवेदन देण्यात आले.

या शिष्टमंडळात रमेश ताराम विधानसभाध्यक्ष, सी.के.बिसेन तालुकाध्यक्ष,सौ.पारबताबाई चांदेवार महिला तालुकाध्यक्ष, नेमीचंद आंबिलकर माजी सभापती,पंकज शहारे नगरसेवक, हिना टेंभरे नगरसेविका यांचा समावेश होता
निवेदनाच्या माध्यमातून तालुक्यात मागील काही दिवसापासून सतत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतीतील पिके घर व गोठ्यांचे नुकसान झालेले आहे त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला असून सर्वत्र विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे घर गोठे व पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने अनेक कुटुंबांना उघड्यावर संसार करण्याची पाळी ओढवली आहे एकंदरीत अडचणीत सापडलेल्या आमगाव तालुक्यात तातडीने मदत करण्याची गरज आहे म्हणून प्रशासनाच्या माध्यमातून नुकसानीचे पंचनामे व सर्वेक्षण करून राज्य सरकारने नुकसानग्रस्तांना त्वरित मदत करावी अशी मागणी देवरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मा. मुख्यमंत्री महा. शासन यांना निवेदनातून करण्यात आली आहे.
यावेळी निवेदन देतेवेळी प्रामुख्याने मुकेश खरोले शहराध्यक्ष ,चंद्रपाल शहारे, मंजूषा वासनिक,प्रमिला गावळ , ममता बिसेन, दिनेश गोडसेलवार, सचिन भांडारकर , सुजित अग्रवाल, रविकांत बडवाईक ,रंजन मेश्राम, रवींद्र मेश्राम, रामाजी दर्रो ,मेहतरू कुंजाम , ईश्वर कुंभरे , खुशाल कुंभरे ,इंद्रराज नाईक,राजकुमार भेंडारकर , अरूण आचले , शंकर राहांगडले, सत्यवान देशमुख , प्रमिला गावडकर, प्रशांत देसाई , केशव मेंढे, बबलूभाई खान , डाँ. नरेश कुंभरे, रूखन मडावी , प्रेमलाल मळकाम , देवेंद्र बहेकार, शिवशंकर बहेकार ,हिराराम आचले,दिपक चुटे व असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

blank