34.8 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home Top News लवकरच राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याला होणार अटक!:मोहित कंबोज यांच्या दाव्याने खळबळ

लवकरच राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याला होणार अटक!:मोहित कंबोज यांच्या दाव्याने खळबळ

0
59

blank

मुंबई-महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होऊ शकतो. लवकरच राष्ट्रवादीच्या एका बड्या नेत्याला अटक होऊ शकते, असा दावा भाजप नेते मोहित कंबोज यांनी केला आहे. भाजप नेते मोहित कंबोज यांच्या या दाव्यानंतर आता कोणत्या नेत्याच्या पाठी तपास संस्थांचे शुक्लकाष्ठ लागणार, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. ते म्हणाले की, लवकरच राष्ट्रवादीच्या एका बड्या नेत्याची नवाब मलिक आणि अनिल देशमुखांशी भेट होणार आहे.

राष्ट्रवादीचे दोन बडे नेते नवाब मलिक आणि अनिल देशमुख आधीच तुरुंगात आहेत. शिवसेना नेते सजय राऊत यांची ईडीने ताब्यात घेऊन चौकशी केली आहे. संजय राऊत सध्या मुंबईतील आर्थर रोड कारागृहात आहेत. याआधीही नवाब मलिक यांच्या अटकेपूर्वी कंबोज यांनी याच आशयाचे ट्वीट केले होते. त्यानंतर मलिकांना अटक झाली होती. यामुळे त्यांचे हेही भाकीत खरे होते की काय, अशी चर्चा सुरू झाली आहे.

राष्ट्रवादीचा तो नेता कोण?

भाजप नेते मोहित कंबोज यांनी राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्याला अटक होणार असल्याचा दावा केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. मोहित कंबोज यांनी ट्विट केले आहे की, लवकरच राष्ट्रवादीचा एक मोठा नेता नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांची भेट घेणार आहे. मोहित कंबोज यांच्या ट्विटमध्ये नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांच्या नावाचा उल्लेख असल्याने कंबोज यांचा राष्ट्रवादीशी संबंध जोडताना त्यांचा खुलासा होताना दिसत आहे.

blank

काय आहे मोहित कंबोज यांचा दावा?

लवकरच पत्रकार परिषद घेऊन या नेत्याबाबत मोठा खुलासा करणार असल्याचा दावा मोहित कंबोज यांनी केला आहे. मी लवकरच पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याबाबत खुलासा करणार असल्याचे कंबोज यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. देश-विदेशात मालमत्ता, बेनामी कंपनी, महिला मित्राच्या नावावर मालमत्ता, मंत्रिपदावर असताना भ्रष्टाचार केला. तसेच कुटुंबाचे उत्पन्न आणि मालमत्तेची यादी जाहीर करणार असल्याचे सांगितले आहे. मात्र, मोहित कंबोज मोठा खुलासा कधी करणार हे ठरलेले नसून कंबोज यांच्या दाव्यामुळे राजकीय वातावरण मात्र तापू लागले आहे.

blank