37.9 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home विदर्भ छोटा गोंदियातील विद्युत व्यवस्था झाली सुरळीत

छोटा गोंदियातील विद्युत व्यवस्था झाली सुरळीत

0
28

blank

गोंदिया,  छोटा गोंदिया परिसरातील चिचबन मोहल्ला परिसरात विजेचे तार लोंबकळत होते. अनेकदा तक्रार आणि विनंती करून देखील महावितरणने त्याकडे दुर्लक्ष केले होते. अखेर जनशक्ती बहुउद्देशीय सामाजिक संघटनेच्या वतीने पुढाकार घेत त्या वाहिन्या सुरळीत करण्यात आल्या.
छोटा गोंदियातील महात्मा ज्योतीबा फुले चौक परिसरातील (चिचबन मोहल्लाकडे जाणारी गल्ली) सुभाष कुसराम यांच्या घरापासून ते गणेश पटले यांच्या घरापर्यंत सुमारे 8 ते 10 घरांवरून ईलेक्ट्रिक विजेचे तार अनेक वर्षांपूर्वी टाकण्यात आले होते. ते तार घरांवर असल्यामुळे धोका होता. त्यातच त्या तारा लोंबकळल्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नव्हती. अनेकदा महावितरणकडे विजेचे तार काढण्यासाठी निवेदन देण्यात आले होते. मात्र वारंवार निवेदन करूनही कोणतीही पाऊल महावितरणने उचलले नाही. शेवटी जनशक्ती बहुउद्देशीय सामाजिक संघटनेचे संयोजक तिर्थराज उके , अध्यक्ष अनिल शरणागत, मार्गदर्शक संघटक मयूर मेश्राम व संघटनेच्या अन्य सदस्यांच्या पुढाकार व प्रयत्नाने नुकतेच या परिसरात नवीन खांब लावून वाहिन्या टाकण्यात आल्या. परिसरातील नागरिकांनी जनशक्ती बहुउद्देशीय सामाजिक संघटनेचे आभार मानले.

blank