देवरी हत्याकांड: तीन दिवस उलटून आरोपी अद्यापही मोकाट

0
290

देवरी पोलिसांना सापडेना ‘त्या’ महिलेचा हत्यारा

देवरी,दि.20:-देवरी शहरातील बहुचर्चित ‘शशिकला साखरे’ हत्याकांडाला तब्बल तीन दिवसांचा कालावधी उलडूनही ‘त्या’ महिलेचा हत्यारा अद्यापही पोलिसांच्या हाती लागला नाही. केवळ संशयितांच्या चौकशीपलिकडे पोलिसांना या प्रकरणात अद्यापही फारसे यश आले नाही. परिणामी, ‘तो’ मारेकरी पोलिसांना कधी गवसणार? असा प्रश्न देवरी शहरात चर्चिला जात आहे.

स्थानिक पंचशिल चौकात भाड्याने राहणाऱ्या शशिकला साखरे नामक महिलेची गळा चिरून गेल्या 17 तारखेला भरदिवसा हत्या करण्यात आली होती.  या घटनेला तब्बल तीन दिवसाचा कालवधी लोटूनही ‘त्या’ महिलेला मारेकरी देवरी पोलिसांना शोधूनही सापडत नाही. दरम्यान, अनेक संशयितांना ताब्यात घेत साधी विचारपूस केली गेली. तरीही देवरी पोलिसांना या गुन्ह्यातील आरोपीचा साधा ‘क्ल्यू’ सुद्धा मिळाला नसल्याचे सांगण्यात येत आहे.

 शहरातील वर्दळीचा ठिकाण असलेल्या पंचशील चौकातील किरायाने राहत असलेल्या शशिकला साखरे 35 वर्षे हिचा तीन दिवसापूर्वी दुपारच्या सुमारास गळ्यावर धारदार शस्त्राने वार करत अज्ञात व्यक्तीने हत्या केली होती. या महिलेची हत्या जून्या वैमनस्यातून झाली असल्याचा प्राथमिक अंदाजही पोलिसांनी बांधला होता. बऱ्याच संशयित व्यक्तींना चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यातही घेतले. या हत्या कांडातील आरोपीच्या मुसक्या लवकरच आवळणार, असा आत्मविश्वास ही पोलिसांनी व्यक्त केला होता. परंतु, तीन दिवस लोटूनही मारेकरी अद्यापही मोकाटच आहे. श्वानपथक आणून ही त्याचा फायदा पोलिसांना मिळाला नाही. यावरून आरोपी किती चालाख असावा, असा प्रश्न या निमित्ताने विचारला जात आहे.

प्रकरणाची माहिती गोंदियाचे पोलिस अधीक्षक विश्व पानसरे यांनी सुद्धा घटनास्थळी भेट दिली. अप्पर पोलिस अधीक्षक अशोक बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली देवरीचे ठाणेदार रेवचंद सिंगनजुडे आरोपीचा शोध घेण्याकामी रात्रीचे दिवस करीत आहेत. असे असले तरी पोलिसांचा हाती काही लागत नसल्याने आता आरोपीला पकडण्यासाठी पोलिस कोणती उपाययोजना करतात,याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे.