स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अतंर्गत खजरी शाळेतील विद्यार्थ्यांचे देशभक्तीपर सांस्कृतीक स्पर्धांचे आयोजन

0
12

स/अर्जुनी(20 ऑगस्ट)-तालुक्यातील आदिवासी विकास हायस्कूल व कला विज्ञान उच्च माध्यमिक विद्यालय खजरी च्या वतिने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा अतंर्गत ता.12 ऑगस्ट ते ता.20 ऑगस्ट पर्यंत विविध देशभक्तीपर सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन उत्साहात करण्यात आले.
15 ऑगस्ट रोजी अतिवृष्टी मूळे रद्द झालेल्या स्पर्धांचे आयोजन ता.20 ऑगस्ट, शनिवारी करण्यात आले.
उद्घाटक माजी उपसभापती राजेश कठाणे व अध्यक्षस्थानी पर्यवेक्षक रविशंकर कटरे व इतर मान्यवर उपस्थित होते.
ता.12 ऑगस्ट रोजी-पोलीस स्टेशन डुग्गीपारच्या वतिने,ता.13 ऑगस्ट रोजी ध्वजारोहन व प्रा.वाय.टी.परशुरामकर यांचे मार्गदर्शन, ता.14 ऑगस्ट रोजी ध्वजारोहन व देशभक्तीपर सांस्कृतिक स्पर्धा,ता.15 रोजी ध्वजारोहन व पालक शिक्षक सभा,ता.20 ऑगस्ट रोजी जादूटोणा विरोधक कायदे व प्रात्यक्षिक संदर्भात अंधश्रद्धा निर्मूलन प्रचारक समीर कोरे यांचे व्याख्यान व विविध देशभक्तीपर सांस्कृतिक स्पर्धा आयोजित करण्यात आल्या.