
भंडारा :– विदर्भात मागील काही दिवसांपासून निर्माण झालेल्या पूर परिस्थितीच्या पाश्र्वभूमीवर शेती पिकांच्या झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्याच्या दृष्टीने राज्याचे कृषिमंत्री मा.अब्दुल सत्तार यांनी नागपूर विभागीय कार्यालयात बैठक बोलावली होती. या बैठकीत खासदार सुनील मेंढे यांनी भंडारागोंदिया जिल्ह्यातील शेतकèयांच्या अडचणी आणि समस्यांकडे शासनाचे लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केला. भंडारा जिल्ह्यामध्ये तुमसर, मोहाडी आणि भंडारा तालुक्यातील काही गावांना मोठ्या प्रमाणावर पुराचा फटका बसला. मोहाडी तालुक्यात बामणी, आंधळगाव, करडी, बेटाळा, खडकी, बोरगाव, तुमसर तालुक्यातील बोरी, उमरवाडा, कोष्टी, बामणी, चारगाव, ढोरवाडा, सुकळी, पांजरा, तामसवाडी, सीलेगाव, बपेरा, बघेडा तसेच भंडारा तालुक्यातील सालेबर्डी, शिरसघाट, करचखेडा, खैरी, कोथूर्ना तसेच गोंदिया जिल्ह्यातील काटी, कासा, बिरसोला, खमारी, फुलचूर, संजय नगर, गोंदिया, तिरोडा, लोधीटोला या गावातील घरांचे तर नुकसान झाले मात्र शेतीचेही अतोनात नुकसान झाले. शेतकèयांचे झालेले नुकसान प्रचंड आहे. अशावेळी त्यांना दिल्या जाणाèया मदतीचाही सहानुभूतीपूर्वक विचार करून निर्णय घ्यावा अशी मागणी खासदार सुनील मेंढे यांनी कृषिमंत्र्यांकडे केली.
सर्व शेतकèयांना पिक विम्याचा लाभ कसा देता येईल, याकडे सुद्धा सकारात्मक दृष्ट्या पाहिले जावे अशी विनंती खासदारांनी केली. पीक विम्याच्या संदर्भात जनजागृती करण्याच्या दृष्टीने विस्तृत माहिती शेतकèयांपर्यंत पोहोचवण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. नुकसान भरपाई देताना कोणीही वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी असेही खासदारांनी यावेळी सांगितले. अधिकाèङ्मांच्या चुकीच्या अहवालामुळे धान खरेदी न झाल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. अजूनही भंडारा गोंदिया जिल्ह्यातील जवळपास बèयाच शेतकèयांचे धान विकल्या गेलेनाहीत. हा विषय तत्काळ मार्गी लावावा आणि चुकीचा अहवाल पाठवणाèया दोषी अधिकाèयांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी खासदार सुनील मेंढे यांनी बैठकी दरम्यान केली. जे अधिकारी चुकीचा अहवाल पाठविण्यासाठी कारणीभूत आहेत त्यांच्यावर चौकशी करून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.धान खरेदीच्या विषयावर विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांनी अहवाल तयार करून पाठवावा, सकारात्मक निर्णय लवकरात लवकर घेतला जाईल मंत्री अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट केले. यावेळी प्रदेशाध्यक्ष मा.चंद्रशेखर बावनकुळे, खासदार, मा.आमदार, आयुक्त व संबधित विभागाचे अधिकारी वर्ग उपस्थित होते.