40.7 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home विदर्भ विमलताई विज्ञान कनिष्ठ महाविद्यालययेथे वाहतुकीचे नियम या विषयावर कायदेविषयक कार्यक्रम

विमलताई विज्ञान कनिष्ठ महाविद्यालययेथे वाहतुकीचे नियम या विषयावर कायदेविषयक कार्यक्रम

0
31

blank

गोंदिया,दि.23ः-
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय, गोंदिया व श्रीमती विमलताई विज्ञान महाविद्यालय गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक 23 ऑगस्ट 2022 रोजी वाहतुकीचे नियम या विषयावर कार्यक्रमाचे आयोजन श्रीमती विमलताई  महाविद्यालय, कटंगी कला, गोंदिया येथे  करण्यात आलेले होते.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ए. व्ही. कुलकर्णी मुख्य न्यायदंडाधिकारी, गोंदिया व प्रमुख मार्गदर्शक म्हणून एम. एस.बनसोडे, पी आय, जिल्हा वाहतूक शाखा,  गोंदिया लाभलेले होते तसेच एम. एल.रहांगडले, मुख्याध्यापक , यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडले.
प्रमुख मा्गदर्शक म्हणून लाभलेले बनसोडे सर यांनी वाहतुकीचे नियमाबद्दल सविस्तर माहिती दिली तसेच अध्यक्षीय भाषणामध्ये श्री कुलकर्णी ( न्यायाधिश)यांनी शाळेतील उपस्थित मुला मुलींना वाहतुकीच्या नियमाचे  पालन करणे सर्वांनी गरजेचे आहे सांगितले.  तसेच गाडी चालवताना हेल्मेट चा वापर करावे व चार चाकी चालवतांनी सीटबेलच्या वापर करणे अत्यंत गरजेचे आहे तसेच इतर वाहतुकीच्या नियमाबद्दल सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन भंडारकर सर यांनी केले कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्याकरता जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय, गोंदिया येथील कर्मचारी सचिन कठाणे, प्रेक्षिक गजभिये व पीएलव्ही जगदीश पटले तसेच श्रीमती विमलताई जुनियर कॉलेज येथील शिक्षक वर्ग यांनी मोलाचे योगदान दिले..

blank