33.9 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home क्रीडा देशाची प्रगती त्यांच्या मनुष्यबळ विकासावर अवलंबून असते – शिक्षणाधिकारी महेंद्र गजभिये

देशाची प्रगती त्यांच्या मनुष्यबळ विकासावर अवलंबून असते – शिक्षणाधिकारी महेंद्र गजभिये

0
47

blank

 गोंदिया,दि.30 : कोणत्याही देशाची प्रगती ही त्यांच्या मनुष्यबळ विकासावर अवलंबून असते. हॉकीचे जादुगर मेजर ध्यानचंद यांच्यापासून नवोदित खेळाडूंनी प्रेरणा घ्यावी व देशभक्ती व स्वाभिमानी अंगी बाळगून देशासाठी खेळले पाहिजे, असे प्रतिपादन शिक्षणाधिकारी महेंद्र गजभिये यांनी राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या कार्यक्रम प्रसंगी केले.

        क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तथा जिल्हा क्रीडा परिषद गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने 29 ऑगस्ट रोजी मेजर ध्यानचंद यांच्या जन्म दिनानिमीत्त राष्ट्रीय क्रीडा दिनाचे आयोजन जिल्हा क्रीडा संकुल मरारटोली गोंदिया येथे करण्यात आले.

        कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षणाधिकारी महेंद्र गजभिये होते तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा कोषागार अधिकारी चंद्रशेखर आंबोले, अपर कोषागार अधिकारी नंदकिशोर भंडारे, महिला व बालकल्याणचे विस्तार अधिकारी तिर्थराज उके, राज्य क्रीडा मार्गदर्शक एन.एस.उईके उपस्थित होते.

        आझादी का अमृत महोत्सव निमीत्त जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने जिल्हास्तरीय मिनी मॅराथॉन (5 कि.मी.) स्पर्धेचे आयोजन 14 ऑगस्ट रोजी जिल्हा क्रीडा संकुल गोंदिया येथे करण्यात आले होते. त्यामध्ये प्राविण्य मिळविलेल्या प्रत्येक गटास अ) शालेय गट (मुले) 14 ते 19 वर्ष प्रथम निखार भलावी, द्वितीय अंश दोनोडे, तृतीय मनिष मेश्राम. ब) महाविद्यालयीन गट (मुले) 20 ते 25 वर्ष प्रथम सागरसिंग पवार, द्वितीय आदित्य सोनुले, तृतीय संदिप चिखलोंडे. क) प्रौढ गट (पुरुष) प्रथम महेंद्र मुरकुटे, द्वितीय अमोल चचाणे, तृतीय सागर झाले विजयी झाले. विजयी स्पर्धकांना रोख पारितोषिक अनुक्रमे प्रथम 5 हजार रुपये, द्वितीय 3 हजार रुपये व तृतीय 2 हजार रुपये व मेडल्स, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ प्रदान करुन सत्कार करण्यात आला.

        तसेच सन 2018-19 मधील शालेय क्रीडा स्पर्धेत प्राविण्य प्राप्त शाळांना प्रोत्साहनात्मक अनुदानातून पुढील प्रमाणे पुरस्कार प्रदान करण्यात आले. 14 वर्षाखालील मुले/मुली वयोगटातील भारतीय ज्ञानपीठ स्कुल गोंदिया यांना 1 लाख रुपये, शारदा कॉन्व्हेंट इंग्लीश हायस्कुल गोंदिया यांना 75 हजार रुपये, लिटील फ्लावर स्कुल गोंदिया यांना 50 हजार रुपये. 17 वर्षाखालील मुले/मुली वयोगटातील भारतीय ज्ञानपीठ स्कुल गोंदिया यांना 1 लाख रुपये, लिटील फ्लावर स्कुल गोंदिया यांना 75 हजार रुपये, साकेत पब्लीक स्कुल गोंदिया यांना 50 हजार रुपये. 19 वर्षाखालील मुले/मुली वयोगटातील साकेत पब्लीक स्कुल गोंदिया यांना 1 लाख रुपये, लिटील फ्लावर स्कुल गोंदिया यांना 75 हजार रुपये, नुतन महाविद्यालय गोंदिया यांना 50 हजार रुपये प्रोत्साहनात्मक अनुदान वितरीत करण्यात आले. तसेच नाशिक येथे राज्यस्तरीय ॲथलेटीक असोसिएशन मार्फत 26 व 27 ऑगस्ट 2022 रोजी संपन्न झालेल्या राज्यस्तरीय ॲथलेटीक स्पर्धेतील 5000 मीटर रेस वॉकींग मध्ये द्वितीय क्रमांक (रौप्य पदक) प्राप्त केल्यामुळे दिप डोंगरे व प्रशिक्षक हेमकृष्ण बहेकार यांचा सत्कार करण्यात आला.

       कार्यक्रमाचे संचालन क्रीडा अधिकारी ए.बी.मरसकोले यांनी केले, तर उपस्थितांचे आभार धनंजय भारसाकळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिवचरण चौधरी, हेमकृष्ण बहेकार, विनेश फुंडे, शेखर बिरनवार, सुमीत सुर्यवंशी, जयश्री भांडारकर यांनी परिश्रम घेतले.

blank