
गोंदिया,दि.31ः-डुग्गीपार पोलीस ठाणेंतर्गत येत असलेल्या कोहमारा येथील वार्ड क्रमांक 3 मधील एका इसम तलावात बुडाल्याने आपत्ती निवारण विभागाचे शोधपथकाने शोध मोहिम राबवली आहे.ही घटना आज 31 ऑगस्ट रोजी दुपारच्या वेळी घडली.सदर इसमाचे नाव सतीश गोपाल कुरसुंगे (वय 38) असे आहे.जिल्हा शोध व बचाव पथकामार्फत शोध मोहीम राबविण्यात येत असून अजूनही इसम बेपत्ता आहे.सायकांळ झाल्याने शोध मोहीम थांबवण्यात आली असून उद्या गुरुवारला सकाळी परत मोहीम राबवण्यात येणार आहे.





