31.2 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home Top News नक्षल्यांकडून युवकाची हत्या

नक्षल्यांकडून युवकाची हत्या

0
21

गडचिरोली, दि.१५: एटापल्ली तालुक्यातील कोटमी पोलिस मदत केंद्रांतर्गत गडेरी येथील एका युवकाची नक्षल्यांनी काल हत्या केली. सोबू जोगी गोटा(२३) असे मृत युवकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, छत्तीसगड सीमेवरुन कोटमी परिसरात बेकायदेशीररित्या दारुची तस्करी करुन ती विकली जाते. सोबू गोटा याने काल अवैधरित्या विकण्यात येणारी दारु पकडली. यावरुन सोबूचा नक्षल्यांशी वाद झाला. त्यानंतर नक्षल्यांनी रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास त्याला पकडून नेऊन हत्या केली. आज त्याचा मृतदेह आढळून आला. सोबू गोटा हा पोलिसांचा खबऱ्या नव्हता. एकीकडे नक्षलवादी दारुबंदीच्या समर्थनार्थ पत्रकबाजी करतात, तर दुसरीकडे अवैध दारु पकडणाऱ्यास ठार मारतात. नक्षल्यांचे हे दुटप्पी धोरण असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

blank