
जिल्हा समन्वय समितीच्या बैठकीत नियोजन
गोंदिया,दि.03ः–जिल्ह्यात संयुक्त कुष्ठरोग शोध मोहीम व सक्रिय क्षयरोग शोध मोहीम दिनांक 13 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2022 या कालावधीत राज्य शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार राबविण्यात येणार आहे. जिल्हा समन्वय समितीची सभा जिल्हाधिकारी नयना गुंडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन वानखेडे हजर होते.
जिल्हा क्षयरोग व कुष्ठरोग मुक्त होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे आव्हान जिल्हाधिकारी यांनी केले या मोहिमेत मोठ्या प्रमाणात जनजाग्रुती होणे आवश्यक असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सांगितले.
जिल्ह्यात सर्वेक्षण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची आवश्यकता असणार आहे.यासाठी शहरी व ग्रामिण भागासाठी विविध टिम व मोबाइल टीम कार्यान्वित केले जाणार आहे. पर्यवेक्षणासाठी गाव निहाय आरोग्य सेवक, आरोग्य सेविका ,आरोग्य सहाय्यक, आशा गटप्रवर्तक, सामुदायिक आरोग्य अधिकारी यांची निवड केली जाणार असुन सर्वेक्षण करण्यासाठी आशा सेविका, अंगणवाडी सेविका व स्वयंसेवक यांच्या मार्फत करण्यात येणार आहे.
या मोहिमेकरता दोन सदस्यांची एक पथक राहणार आहे या पथकामध्ये आशा सेविका व पुरुष स्वयंसेवक असणारा आहे. हे पथक कुटुंबातील व्यक्तींची तपासणी करणार असून रोगाची लक्षणे आहेत किंवा नाही या बाबत तपासणी करून आरोग्य संस्थेत संदर्भसेवा देण्यात येणार आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र येथे वैद्यकिय अधिकारी व उपकेंद्रात सामुदायिक आरोग्य अधिकारी तपासणी करुन औषधोपचार सुरू केला जाणार आहे त्यामुळे घरी येणाऱ्या पथकाला तपासणीसाठी सहकारी करण्याचे आव्हान जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. नितीन कापसे व सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) डॉ. रोशन राऊत यांनी केले आहे. तालुकास्तरावर तालुका समन्वय समितीची सभा घेण्यात येऊन सर्व प्रकारचे प्रशिक्षण पूर्ण करण्यात येणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन वानखेडे यांनी सांगितले.क्षयरोग संबधाने आरोग्य संस्थेत प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी यांचे मार्फत थुंकी नमुने यांची तपासणी प्रयोगशाळेत करणार येणार असुन थुंकी नमुने अदुषित असणार्या रुग्णांना शासकिय वाहनातुन एक्स- रे काढण्यासाठी संदर्भित केले जाणार असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अमरीश मोहबे यांनी सांगितले.
नियोजन सभेला नागपूर विभागाचे सहाय्यक संचालक(हिवताप) डॉ.एस.डी. निमगडे, जागतिक आरोग्य संघटनेचे कन्सल्टंट डॉ. भाग्यश्री त्रिवेदी, अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय डॉ. कुसुमाकर घोरपडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अमरीश मोहबे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन वानखेडे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिनेश सुतार, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. नितीन कापसे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. वेद प्रकाश चौरागडे, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. निरंजन अग्रवाल, सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) डॉ. रोशन राऊत उपस्थित होते. कार्यशाळा प्रसंगी जिल्ह्यातील सर्व तालुका आरोग्य अधिकारी, ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक,प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी, आरोग्य विभागातील सर्व अधिकारी, जिल्हास्तरीय पर्यवेक्षक उपस्थित होते.





