
गोंदिया : बिमा क्षेत्रातील अग्रगन्य असलेल्या भारतीय जीवन बिमा निगमच्या स्थापनेला ६६ वर्ष पुर्ण झाली. मात्र दुसरीकडे केंद्र शासनाच्या नकारात्मक धोरणामुळे संस्थासह अभिकर्त्यांचेही अस्तित्व धोक्यात आले आहे. त्या अनुषंगाने केंद्र शासनाचा निषेध व अभिकर्त्यांच्या मागण्यांची पुर्तता करण्यात यावी. या मागण्यांना घेवून अभिकर्ता संघटना (लियाफी)च्या वतीने आज कामकाज बंद आंदोलन जयस्तंभ चौक येथील शाखेत संघटनेचे अध्यक्ष भुवन रिनाईत यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले.
समाजातील गरीबापर्यंत पोहचून त्यांना बिमाचे सुरक्षा कवच देणारी म्हणून भारतीय जीवन बिमा निगमचे नाव आहे. केंद्र शासन अधिनस्त ही संस्था कार्यरत आहे. मागील काही वर्षापासून आयआरडी अंतर्गत ही संस्था येत असल्याने त्याचे आता दुष्परिणामही अभिकर्त्यांना दिसू लागले आहे. अभिकर्त्यांचे कमिशन, एकमुस्त मिळणारी रक्कम तसेच अभिकर्त्यांना पेंशन योजना लागू करण्यात यावी, पॉलिसी लाभधारकांना वाढीव बोनस देण्यात यावे, अशा विविध प्रकारावर केंद्र शासनाच्या वतीने कात्री लावण्यात येत आहे. याचा निषेध म्हणून लियाफी संघटनेच्या वतीने १ जून ते ३० नोव्हेंबर या कालावधीपर्यंत असहकार आंदोलन सुरू करण्यात आले आहे. दरम्यान आज पुर्ण कामकाज बंद ठेवून केंद्र शासनाच्या धोरणांचा निषेध करण्यात आला तसेच अभिकर्त्यांना न्याय देण्याची मागणी करण्यात आली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष भुवन रिनाईत, सचिव धर्मानंद मलीक, धरम हटवानी, सोमेश्वर ब्राम्हणकर, प्रवीण शर्मा, दिनेश वाधवानी, प्रमोद सुर्यवंशी, नरसिंग गहरवार, दिनेश तिरेले, खुशाल शिवणकर, प्रेमलाल साठवने, महेंद्र बिसेन, सुनिल कटरे तसेच संघटनेचे सर्व पदाधिकारी व अभिकर्ता या आंदोलनात सहभागी झाले होते.





