37.1 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home विदर्भ समाजहित लक्षात घेवून युवकांनी सहकार्य करावे : अ‍ॅड.चव्हाण

समाजहित लक्षात घेवून युवकांनी सहकार्य करावे : अ‍ॅड.चव्हाण

0
20

blank

गोंदिया : कोणताही समाज संघटनेच्या एकतेशिवाय पुढे जावू शकत नाही. समाजहित व समाजाच्या गरजा पूर्णत्वास नेण्यासाठी समाजातील युवक पुढे येत आहेत. या युवकांनी समाजहित लक्षात ठेवून सहकार्य केल्यास त्याच्या निश्चित समाजाच्या प्रगतीसाठी लाभ होईल, असे मत पोवार प्रगतीशिल मंच गोंदियाचे अध्यक्ष अ‍ॅड.पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.
ते पोवार प्रगतीशिल मंचच्या २९ व्या आयोजित आमसभेत अध्यक्षस्थानावरून बोलत होते. संसर्गामुळे मागील दोन वर्ष पोवार प्रगतीशिल मंचची आमसभा घेण्यात आली नाही. ही आमसभा ४ सप्टेंबर रोजी स्थानिक पोवार बोर्डिंग येथे आयोजित करण्यात आली होती. सभेच्या अध्यक्षस्थानी अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण, उपाध्यक्ष पन्नालाल ठाकरे, सचिव डॉ.पृथ्वी गौतम, सुरेश पटले, बंटी बोपचे, महेंद्र बिसेन, गौरव तुरकर, अजय रहांगडाले, पंकज पटेल, अ‍ॅड.रजत ठाकूर, सौ.रश्मी रहांगडाले यासह मंचचे संचालक तसेच समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. आयोजित आमसभेत मागील ३ वर्षाचे अहवाल वाचन करण्यात आले. तसेच अध्यक्षांच्या अनुमतीने वेळेवर आलेल्या विषयावरही प्रकाश टाकण्यात आला. तसेच येत्या नवरात्र दरम्यान रासगरबा आयोजनावरही चर्चा करण्यात आली. आयोजित आमसभेत प्रविण बिसेन, ओ.जे.बिसेन, विक्की बघेले, पंकज पटेल, शशांक तुरकर आदिंनी संस्थेच्या वतीने सुरू असलेल्या कामाचा आढावा घेत अनेक विषयांवर आक्षेप नोंदविला. याची आमसभेत दखल घेण्यात आली. दरम्यान संस्थेचे माजी अध्यक्ष संजय रहांगडाले , गुलाब बोपचे, शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष राजेश चव्हाण, मंचचे माजी सचिव डॉ.संजीव रहांगडाले आदिंनी उपस्थित समाजबांधवांना संस्थेत असलेल्या विविध त्रृट्यांची माहिती दिली. शेवटी अध्यक्षांनी समाजहित जोपासून युवकांनी समाज व संस्थेच्या प्रगतीसाठी कार्य करण्याचे आवाहन केले.

blank