
“उठ ओबीसी जागा हो”, “संघर्षाचा धागा हो”
चिचगड:-सिताराम मंगल कार्यालय आमगाव रोड येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.कार्यक्रमाची वेळ ११ ते ५ वाजता पर्यत असुन जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याची विनंती केली आहे. महापुरुषांच्या वैचारिक क्रांतीतून प्रेरणा घेऊन बहुजन विद्यार्थी व युवकात जागृती व्हावी या हेतूने वर्तमान काळातील स्थिती, परिणाम व भविष्यातील आव्हाने या विषयावर प्रबोधन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ओबीसी जागृती विचारमंच द्वारे राष्ट्रीय प्रबोधनकार अरविंद माळी करणार संबोधन
ओबीसी समाज हा प्रवर्गानुसार मागासलेला समाज मानला गेला आहे. व ओबीसी समाजाला ज्ञान, सत्ता, पैसा, प्रतिष्ठा यांपासून दूर ठेवण्यात आलेले आहे. ओबीसी समाजाचे हे सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणाचे वास्तव लक्षात घेता घटनाकारांनी ओबीसी समाजाच्या प्रगतीसाठी कलम ३४० हे भारतीय संविधानात लागू केले आणि त्यासाठी शैक्षणिक आरक्षणाची तरतूद केली. असे असूनही ७५ हुन जास्त वर्ष उलटलेल्या स्वतंत्र भारतामध्ये ओबीसी समाजाची स्थिती मात्र आजही दयनीय आहे.
कोणत्याही समाजातील एखादा घटक त्या समाजातील सत्ताधारी वर्गाचा गुलाम तेव्हा होतो, जेव्हा त्या समाजघटकाची ताकद सत्ताधारी वर्गाकडून दाबून टाकली जाते. त्या समाजसमूहाची शक्ती सत्ताधारी वर्गाकडून लपवली जाते, जेणेकरून त्या शक्तीचे आकलन त्या समाज समूहास होऊ नये. असाच काहीसा प्रकार भारतामध्ये ओबीसी समाज समूहाबद्दल झालेला दिसून येतो. ओबीसी समाजसमूह हा साधारण ५ हजारांपेक्षा जास्त जाती-उपजातींचा समूह आहे. हा समाज भारतातील बहुसंख्य समाज असूनही या समाजाला आजपर्यंत भारतातील सत्ताधारी वर्गाने आपल्या टाचेखालीच दाबून धरल्याची स्थिती आजही आपण पाहतो. याचे मूळ कारण म्हणजे ओबीसी समाजाची गेल्या ९१ वर्षांपासून जातीय जनगणनाच भारतात झालेली नाही.
ओबीसी समाजाची शेवटची जातीय जनगणना १९३१ मध्ये ब्रिटिश सरकारच्या काळात झाली. त्यानुसार असे लक्षात आले, की भारतात एकूण लोकसंख्येच्या अर्ध्याहून जास्त लोकसंख्या ही ओबीसी मानल्या जाणाऱ्या जाती समूहांची आहे. हा ओबीसी समाज पूर्वापार चालत आलेल्या जातिव्यवस्थेनुसार ‘शूद्र’ म्हणून गणला जातो. हा ओबीसी समाज भारतातील शहरी आणि ग्रामीण जीवनातील श्रमिक जीवनाचा मूलाधार आहे. असे असूनही १९३१ नंतर भारतामध्ये ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना झालेली नाही. आजही भारत सरकार तसेच महाराष्ट्र सरकार ओबीसी समाजासारख्या सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या समाजाचे नीतीधोरण ठरवताना ९१ वर्षे जुन्या आकडेवारीचा आधार घेत आहे. यातून गंभीर प्रकारच्या सामाजिक, शैक्षणिक विषमता जन्माला येतात अशाच समस्यांना घेऊन एकदिवसीय प्रबोधनाचे आयोजन करण्यात आले आहे व ओबीसी जागृती विचारमचं द्वारे ओबीसी बांधवांना जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याची विनंती केली आहे.





