43.5 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home विदर्भ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात राजे उमाजी नाईक यांना अभिवादन

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात राजे उमाजी नाईक यांना अभिवादन

0
33

blank

गोंदिया,दि.7 : राजे उमाजी नाईक यांचा जयंतीचा कार्यक्रम 7 सप्टेंबर रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया येथे अधिष्ठाता डॉ.कुसुमाकर घोरपडे यांचे प्रमुख उपस्थितीत पार पडला. सदर कार्यक्रमात अधिष्ठाता डॉ.कुसुमाकर घोरपडे यांनी राजे उमाजी नाईक यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. त्यानंतर राजे उमाजी नाईक यांच्या व्यक्तीमत्वाबाबत त्यांनी आपले विचार व्यक्त केलेत.

         सदर कार्यक्रमास कान-नाक-घसा विभाग प्रमुख डॉ.अपुर्व पावडे, डॉ.दिलीप गेडाम, तसेच श्री कुकडे, हरिचंद्र कटरे, शिवम घारड, दिलीप दगडकर, श्री वाघमारे, सोपान दांदळे, राजेश रंगारी, संदिप सोलंकी, श्री जाधव व इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मारोती कुचनकर, सचिन ढोले व रोशन रामटेके यांनी परिश्रम घेतले.

blank