मांडवा येथे गणपती विसर्जन करीता गेलेल्या तिघांचा बुडून मृत्यू

0
35

वर्धा,दि.09- : जिल्ह्यातील मांडवा येथील मोती नाल्यावरील बंधा-यात गणपती विसर्जन करीता गेलेल्या १ युवकासह २
मुलांचा बुडुन मृत्यू झाल्याची घटना आज शुक्रवारी दुपारी ४ च्या सुमारास घडली. मांडवातील संदीप ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या घरच्या गणेशाचे विसर्जन करण्याकरीता संदीप ज्ञानेश्वर चव्हाण (३२), अथर्व सचीन वंजारी (११ ), कार्तीक
तुळशीराम बलवीर (११) हे गेले. त्यांचा पाण्यात बुडुन मृत्यु झाला. मुल पाण्यात बुडत असल्याचे पाहून संदीप यांना
काढण्यासाठी गेला पण संदीपला पोहता येत नसल्याने तोही पाण्यात बुडाला.नाल्यापासुन काही अंतरावर नाल्या लगत अंतिम संस्कार सुरू असताना गणपती विसर्जनला गेलेले मुल डुबत असल्याचे काही मुले आरडा ओरड करीत असल्याचे काही लोकांना दिसल्याने लोकानी धाव घेत यांना बाहेर काढले.व रुग्णालयात घेऊन गेले असता डाँक्टरांनी तिघांनाही मृत घोषित केले.सांवगी पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांनी घटनास्थळ  गाठून पंचनामा केला.