
अर्जुनी मोर-कुपोषणमुक्त महाराष्ट्र ही शासनाची योजना गावागावातील अंगणवाडी केंद्रांमधून राबविली जाते.यासाठी अंगणवाडी सेविकांचे फार मोठे योगदान आहे. सुद्ढ बालक, गरोदर माता, स्तनदा माता, किशोरवयीन मुली या सर्वांचे आरोग्य सुद्ढ रहावे, यासाठी अंगणवाडी केंद्रांमधून त्यांना पोषन आहार पुरवून वेळोवेळी मार्गदर्शन केले जाते. गरोदर माता सुदृढ असली तर सुद्ढ बालक जन्माला येणार त्यासाठी माता व किशोरवयीन मुलींची विशेष देखभाल ही अंगणवाडी केंद्रांमधून अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून केली जाते. त्यामुळे सुद्ढ माता बालसंगोपनासाठी अंगणवाडी केंद्र बहुमुल्य ठरत असल्याचे मत ताडगाव ग्रामपंचायत सदस्या आशाताई नाकाडे यांनी व्यक्त केले आहे.
तालुक्यातील ताडगाव ग्रामपंचायत अंतर्गत राजीवनगर येथे ७ सप्टेंबरला आयोजित राष्ट्रीय पोषण अभियान कार्यक्रमात विशेष मार्गदर्शक म्हणून आशा विनोद नाकाडे ह्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ताडगाव क्षेत्राचे पंचायत समिती सदस्य नुतनलाल सोनवाने होते. उदघाटन सरपंच दामोधर शहारे यांचे हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणुन ग्रामपंचायत सदस्य सुधिर कापगते, आशा विनोद नाकाडे, व्यंकट जांगळे,सामाजिक कार्यकर्ते मनोहर सांगोळे, ग्रामसेवक मडावी, अंगणवाडी सेविका मनिषा नाकाडे, व अन्य मान्यवर उपस्थित होते. सर्वप्रथम देवी सरस्वती व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करुन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. अंगणवाडी सेविका मनिषा नाकाडे यांनी राष्ट्रीय पोषण अभियान कार्यक्रम राबविण्याबाबतची भुमिका आपल्या प्रास्ताविकातुन विशद केली. यावेळी पं.स.सदस्य नुतनलाल सोनवाने यांनी राष्ट्रीय पोषण आहार अभियानाबाबत विस्तृत माहीती देतांना माता व सुद्ढ बालकं जन्माला यावी यासाठी व कुपोषणावर मात करण्यासाठी अंगणवाडी केंद्रासह पंचायत समितीस्तरावर महिला व बालकल्याण विभाग कार्यरत आहे. कुपोषनमुक्त अर्जुनी मोर. तालुक्यासाठी राष्ट्रीय पोषण अभियान कार्यक्रम यशस्वी रित्या राबविण्यासाठी आपन प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. सरपंच दामोधर शहारे यांनी अंगणवाडी सेविकांचे कार्य अतुलनिय असुन कोरोना काळात त्यांनी केलेले कार्य महान होते.
एवढेच नव्हे तर शासनाच्या विविध उपक्रमात अंगणवाडी सेविकांचे योगदान बहुमुल्य असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन अंगणवाडी सेविका मनिषा नाकाडे यांनी केले. तर उपस्थितांचे आभार सरिता गहाणे यांनी मानले. कार्यक्रमाला ग्रामवासी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यशस्वीतेसाठी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी सहकार्य केले.