
गोंदिया-सर्वच पक्ष शेतकर्यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करतात. मात्र शेतकर्यांच्या हितासाठी कोणतेही ठोस पावले उचलत नाही. परंतु भाजपने याआधी किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून तसेच आता मुख्यमंत्री सन्मान योजनेच्या माध्यमातून शेतकर्यांचे आर्थिक हित जोपासत त्यांच्या जीवनमान सुधारण्यासाठी प्रयत्न करीत आहे. त्यामुळे भाजपच हा खर्या अथार्ने शेतकरी हितैशी पक्ष आहे, असे प्रतिपादन भाजपा किसान आघाडी जिल्हाध्यक्ष तसेच जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती संजय टेंभरे यांनी केले.
भारतीय जनता पक्ष किसान आघाडीच्या वतीने तालुक्यातील धापेवाडा येथे (ता.११) दवणीवाडा मंडळ अध्यक्ष धनेंद्र अटरे यांच्या अध्यक्षतेखाली सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संजय टेंभरे मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी विशेष अतिथी म्हणून जिल्हा भाजपा उपाध्यक्ष नंदू बिसेन, जिल्हा परिषद सदस्य विजय उईके, किसान आघाडी तालुकाध्यक्ष सुभाष बागडे, किसान आघाडी जिल्हा उपाध्यक्ष भोजू भाऊ बिसेन, सरपंच प्रकाश कटरे, सरपंच कमलेश दमाहे, किसान आघाडी महामंत्री अशोक हरिणखेडे, भक्त प्रल्हाद लिल्हारे, कुवर भाऊ ठाकरे, गज्जू भाऊ रहांगडाले, विष्णू नागपुरे, मंगल ठाकूर, अर्श्वजीत गजभिये, गोविंद बघेले, मधू भाऊ रहांगडाले, देवलाल पटले, सुरेंद्र दमाहे यांच्यासह अनेक भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी शेतकर्यांच्या अडी अडचणी सोडविण्यासाठी तसेच त्यांचा आवाज उठविण्यासाठी किसान आघाडीने पुढाकार घेण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली.





