35.8 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home Top News दुर्दैवी घटना..घरात झोपलेल्या दोन चिमुकल्‍या भावंडाचा सर्पदंशाने मृत्यू

दुर्दैवी घटना..घरात झोपलेल्या दोन चिमुकल्‍या भावंडाचा सर्पदंशाने मृत्यू

0
244

blank

भंडारा : घरात झोपलेल्या दोन भावंडांचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील देव्हाडा खुर्द येथे घडली. या घटनेची माहिती होताच शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी देव्हाडा खुर्द येथे धाव घेतली आहे.सुशील बलवीर डोंगरे (वय ८) व उत्कर्ष बलवीर डोंगरे (वय ११) असे मृत भावंडाचे नाव आहे. दोन्‍ही भाऊ रात्री एकाच बिछान्यावर झोपले होते. रात्री मागच्या दारातून साप आत आला. तो बिछान्यावर चढला असता त्या सापाने दोघाही भावांना दंश  केला. काहीतरी चावल्याचा भास झाल्‍याने जाग आली. पाहिले असता साप चावल्याचे लक्षात आले. यानंतर दोघाही भावांना उपचारासाठी आधी तुमसर येथील शासकीय रुग्णालयात  नेण्यात आले होते.भंडारा येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले असता उपचारादरम्यान थोरला भाऊ उत्कर्ष बलवीर डोंगरे यांचा रात्री मृत्यू झाला. तर भंडारा येथून धाकटा भाऊ सुशील बलवीर डोंगरे याला भंडारा येथून रात्रीच नागपूर येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. मात्र त्याचा देखील आज सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे देव्हाडा खुर्द गावात शोककळा पसरली आहे.

blank