43.5 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home विदर्भ बोदरा गावाची ड्रोनद्वारे गावठाण मोजणी, ग्रामस्थांना जंगम मालमत्ता मिळकतीचे अधिकार पत्र मिळणार...

बोदरा गावाची ड्रोनद्वारे गावठाण मोजणी, ग्रामस्थांना जंगम मालमत्ता मिळकतीचे अधिकार पत्र मिळणार : शितल पुंड

0
53

blank

अर्जुनी-मोरगाव : आजघडीला ग्रामस्थांना स्वतःच्या जंगम मालकीचे अधिकृत अधिकार पत्र मिळालेले नाही. शासनाच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी कधीकाळी सामान्य जनतेला वंचित रहावे लागते. ग्रामपंचायतचा गाव नमुना आठवत फक्त नोंद असते. शासनाच्या निर्देशाप्रमाणे ड्रोनद्वारे गावठाण मोजणी अभियान राबविण्यात येत आहे. आता यापुढे गावकऱ्यांना आपल्या मिळकतीचे अधिकृत अधिकार पत्र मिळणार आहे.

समस्त ग्रामवासी यांनी संबंधित विभागाला सहकार्य करावे, गावाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी सामूहिक प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी शितल पुंड यांनी केले. अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ग्राम बोदरा देऊळगाव येथे मिळकतीचे ड्रोनद्वारे गावठाण मोजणी उपक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी त्या गावकर्‍यांशी हितगुज साधताना बोलत होत्या.

बोदरा देऊळगाव या गट ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात जिल्ह्यात प्रथमच ड्रोनद्वारे गावठाण मिळकतींचा मोजणी शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख रोहिणी सागरे, पंचायत समितीचे खंड विकास अधिकारी विलास निमजे, तालुका भूमि अभिलेख कार्यालयाचे उपअधीक्षक धनंजय सोळंके, सर्वे आप इंडिया पुण्याचे धर्मेंद्र टेंभुर्णे, सरपंच संकर उईके, उपसरपंच गजानन शहारे, पोलीस पाटील नासिकेत कापगते, पंचायत समितीचे कृषी विस्तार अधिकारी बंडगर, माजी उपसरपंच माधवराव झोडे, दिनेश चौधरी, सुनील बनकर आदी उपस्थित होते.

यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी शितल पुंड यांनी गावात मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध होण्यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करावेत, गावातील जागरूक लोकप्रतिनिधी गावाच्या विकासकामाला प्राधान्य देतो, ग्रामीण भाग स्वयंपूर्ण होणे गरजेचे आहे. जनतेला मालकी हक्क मिळणार, गावठाण शासकीय मालमत्ता ओळखता येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामसेवक अमोल सानप यांनी केले. आभार गजानन शहाणे यांनी मानले. दोन्ही गावातील मिळकतीचे ड्रोनद्वारे गावठाण मोजणीसाठी सर्वे आप इंडिया पुण्याचे पथक, तालुका भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचारी, ग्रामपंचायतचे पवन जांभुळकर, प्रदीप कांबळे यांनी सहकार्य केले.

848 मिळकतींची नोंद

शितल पुंड यांनी रिमोटद्वारे ड्रोनचे उडान केले, देऊळगाव तसेच बोदरा या दोन्ही गावाचे ड्रोनद्वारे भ्रमण करून 848 मिळकतींची नोंद करण्यात आली.

blank